Devdutt Padikkalने २० चेंडूंत ९२ धावा चोपल्या, शतक झळकावत महाराष्ट्राच्या गोलंदाजांची केली धुलाई

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा देवदत्त पडिक्कल ( Devdutta Padikkal) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा हिरो ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 06:30 PM2022-10-11T18:30:58+5:302022-10-11T18:31:31+5:30

whatsapp join usJoin us
Devdutt Padikkal 124 runs in 62 balls with 14 fours and 6 sixes, Karnataka 215/2 against Maharashatra in SYED MUSHTAQ ALI TROPHY  | Devdutt Padikkalने २० चेंडूंत ९२ धावा चोपल्या, शतक झळकावत महाराष्ट्राच्या गोलंदाजांची केली धुलाई

Devdutt Padikkal 124 runs in 62 balls

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा देवदत्त पडिक्कल ( Devdutta Padikkal) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा हिरो ठरला. कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने महाराष्ट्राच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याच्या नाबाद १२४ धावांच्या जोरावर कर्नाटकने २ बाद २१५ धावांचा डोंगर उभा केला. मनिष पांडे यानेही अर्धशतकी खेळी करताना धावसंख्येत हातभार लावला.

कर्णधार मयांक अग्रवाल व देवदत्त सलामीला आले. मयांक २८ धावांवर माघारी परतल्याने ३४ धावांवर कर्नाटकला पहिला धक्का बसला. त्यानंतर देवदत्त व मनिष यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी केली. मनिष ३८ चेंडूंत १ चौकार व ४ षटकार खेचून ५० धावांवर बाद झाला. देवदत्त मात्र अखेरपर्यंत फटकेबाजी करत राहिला. त्याने ६२ चेंडूंत नाबाद १२४ धावा चोपल्या. त्यात १४ चौकार व ६ षटकार अशा ९२ धावा या केवळ २० चेंडूंत आल्या. कर्नाटकने २ बाद २१५ धावा केल्या. महाराष्ट्राचा आर हंगर्गेकर याने ४ षटकांत ५०, आर घोषने ४ षटकांत ५८ धावा दिल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Devdutt Padikkal 124 runs in 62 balls with 14 fours and 6 sixes, Karnataka 215/2 against Maharashatra in SYED MUSHTAQ ALI TROPHY 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.