- सुनील गावसकर लिहितात...आॅस्ट्रेलियाला वन-डे मालिकेत पराभूत केल्यानंतर भारतीय संघ टी-२० मालिकेत दावेदार म्हणून सुरुवात करणार आहे. वन-डे मालिकेत वर्चस्व गाजवल्यानंतर यजमान संघ टी-२० क्रिकेटमध्येही उंचावलेल्या मनोधैर्यासह सहभागी होणार आहे. खेळात कुठलीच गोष्ट निश्चित नसते आणि टी-२० क्रिकेटमध्ये तर ही बाब अधिक अवघड असते. एक षटक सामन्याचा निकाल बदलू शकते.यजमान संघाच्या तुलनेत आॅस्ट्रेलियाला खेळाच्या अनेक विभागात सुधारणा करावी लागेल. संघाची फलंदाजी ‘टॉप थ्री’वर (अॅरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथ) अवलंबून आहे. या व्यतिरिक्त मॅक्सवेल टी-२०चा आकर्षक खेळाडू आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानची जशी स्थिती होती की कोण मैदानावर उतरणार अगदी तशी स्थिती मॅक्सवेलची झाली आहे.कुठलाही खेळाडू देशातर्फे खेळताना शंभर टक्के योगदान देत नाही, असे म्हणणे संयुक्तिक नाही, पण मॅक्सवेलची गेल्या काही सामन्यांतील कामगिरी बघता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघामध्ये स्थान कायम राखणे त्याच्यासाठी आव्हान आहे. तो जर फॉर्मात असेल तर संघासाठी तो सामन्याचे चित्र बदलण्यास अजिबात वेळ घेत नाही. मैदानाच्या प्रत्येक भागात तो आपल्या इच्छेनुसार उंचावरून फटके खेळण्याचा आनंद घेतो. त्याचसोबत वन-डे मालिकेत फिंच-वॉर्नर जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिल्यामुळे आॅस्ट्रेलियन थिंक टँक टी-२० मध्येही याच जोडीला कायम राखण्यास उत्सुक असेल. भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवणाºया वेगवान गोलंदाजांची आॅस्ट्रेलियाला उणीव भासत आहे.अॅशेस मालिकेच्या तयारीसाठी मायदेशी परतलेल्या पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत आॅस्ट्रेलियन संघाकडे यजमान संघाच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवणारा दुसरा वेगवान गोलंदाज नाही. नॅथन कुल्टर नाईलने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगले यश मिळवले असले तरी भारताच्या मजबूत फलंदाजीचा विचार करता त्याची मेहनत पुरेशी नाही. शिखर धवनच्या पुनरागमनामुळे भारतीय फलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. त्याचसोबत सलामीला उजव्या व डावखुºया फलंदाजांच्या जोडीमुळे आॅस्ट्रेलियन गोलंदाजांसाठी अडचण निर्माण होवू शकते. रोहित शर्मा शानदार फॉर्मात आहे. तो ज्याप्रकारे फटके खेळत आहे ते बघून त्याला रोखणे आॅस्ट्रेलियन गोलंदाजांसाठी आव्हान आहे. कोहलीला मर्यादित षटकांच्या मालिकेमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नसली तरी त्याचे फटके मात्र प्रभावी होते. भारतातर्फे भुवनेश्वर, बुमराह, चहल, अक्षर पटेल व कुलदीप यादव यांनी अचूक मारा करीत वॉर्नर-फिंच यांच्या शानदार सुरुवातीनंतरही आॅस्ट्रेलियाची धावसंख्या नियंत्रणात ठेवली. अशा स्थितीत आगामी मालिकेत आॅस्ट्रेलियासाठी काहीच सोपे नाही. त्यांना जर भारताचा पराभव करायचा असेल तर त्यांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. (पीएमजी)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- वर्चस्व गाजवण्याचा विराट सेनेचा निर्धार
वर्चस्व गाजवण्याचा विराट सेनेचा निर्धार
आॅस्ट्रेलियाला वन-डे मालिकेत पराभूत केल्यानंतर भारतीय संघ टी-२० मालिकेत दावेदार म्हणून सुरुवात करणार आहे. वन-डे मालिकेत वर्चस्व गाजवल्यानंतर यजमान संघ टी-२० क्रिकेटमध्येही उंचावलेल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 03:59 IST