Join us

पराभूत होऊनही वेलॉसिटी अंतिम फेरीत

मेघना (७३) आणि जेमिमा रॉड्रिग्सच्या (६६) यांनी केलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर ट्रेलब्लेझर्सने वेलॉसिटीविरुद्ध ५ बाद १९० धावांचे आव्हान उभारले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 05:55 IST

Open in App

पुणे : अष्टपैलू किरण नवगिरेच्या (६९) अर्धशतकी खेळीनंतरही वेलॉसिटी संघाला ट्रेलब्लेझर्सकडून १६ धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र सरस धावगतीच्या आधारे या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात ते यशस्वी ठरले. ज्यात त्यांचा सामना सुपरनोवाज संघासोबत होणार आहे. १९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेलॉसिटी संघाने आश्वासक सुरुवात केली होती. मात्र त्यांना निर्धारित २० षटकांत १७४ धावाच करता आल्या. ट्रेलब्लेझर्सकडून गायकवाड आणि  यादवने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तत्पूर्वी एस. मेघना (७३) आणि जेमिमा रॉड्रिग्सच्या (६६) यांनी केलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर ट्रेलब्लेझर्सने वेलॉसिटीविरुद्ध ५ बाद १९० धावांचे आव्हान उभारले. 

संक्षिप्त धावफलकट्रेलब्लेझर्स : २० षटकात पाच बाद १९० (एस. मेघना ७३, जेमिमा रॉड्रिग्ज ६६) गोलंदाजी : सिमरन बहादूर २/३१, केट क्रॉस १/२७, स्नेह राणा १/३७, खाका १/२७. वेलॉसिटी : २० षटकांत नऊ बाद १७४ (किरण नवगिरे ६९, शेफाली वर्मा २९) गोलंदाजी : पूनम यादव २/३३, राजेश्वरी गायकवाड २/४४, सोफी डंकले १/८, हिली मॅथ्यू १/२०, सलामा खातुन १/२२, रेनुका सिंग १/३२.

 

टॅग्स :आयपीएल २०२२पुणे
Open in App