Delhi Capitals Players Congratulated KL Rahul Video : भारतीय क्रिकेटर आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा विकेट किपर बॅटर लोकेश राहुल नुकताच बाबा झालाय. क्रिकेटरची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी हिने सोमवारी, मुलीला जन्म दिला. केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांनी सोशल मीडियावरुन एक खास पोस्ट शेअर करत ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली. 'बाप'माणूस झालेल्या लोकेश राहुलसाठी दिल्लीच्या ताफ्यातील त्याच्या सहकाऱ्यांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून केएल राहुल-अथियाला हटके अंदाजात शुभेच्छा
केएल राहुलच्या लेकीचा जन्म दिवस दिल्ली कॅपिटल्स संघासाठीही अविस्मरणीय ठरला. कारण विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात एतिहासिक विजय मिळवून संघानं यंदाच्या हंगामात विजयी सलामी दिल्याचे पाहायला मिळाले. या विजयाची चर्चा रंगत असताना आता दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील एक खास व्हिडिओ समोर आला आहे. संघातील खेळाडूंनी केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळते.
KL राहुल झाला बाबा! पत्नी अथिया शेट्टीसह चाहत्यांसोबत शेअर केली गोड बातमी
दिल्लीच्या ताफ्यातील खेळाडूंचा व्हिडिओ चर्चेत
दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात संघातील सर्व खेळाडू लोकेश राहुलला हटके अंदाजात शुभेच्छा देताना पाहायला मिळते. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन अक्षर पटेलसह परदेशी खेळाडू आणि स्टाफ सदस्य हाताचा पाळणा करून हटके अंदाजात लोकेश राहुलला शुभेच्छा देताना व्हिडिओमध्ये दिसून येते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
आता लवकरच दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात परतेल केएल राहुल
यंदाच्या हंगामात केएल राहुल हा दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. ज्या दिवशी दिल्लीचा संघ या स्पर्धेतील पहिला सामना खेळायला मैदाना उतरला त्याच दिवशी केएल राहुलच्या घरी पाळणा हलला. त्यामुळेच त्याला पहिल्या सामन्याला मुकावे लागले होते. विशाखापट्टणमच्या मैदानात होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात तो संघाला जॉईन होईल अशी अपेक्षा आहे.