IPL २०२६ स्पर्धेला सुरुवात होण्याआधी काही परदेशी खेळाडूंमुळे IPL फ्रँचायझी संघाचे टेन्शन वाढवलं आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) पहिल्या सामन्यापासून मैदानात उतरणार का? या संदर्भातील प्रश्नावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने मौन सोडले आहे.
ऑस्ट्रेलियन बोर्डानं अजून परवानगीच नाही दिली
ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने अजूनही मिचेल स्टार्कला ना हरकत प्रमाणपत्र (NOC) दिलेले नाही. पण ही प्रक्रिया लवकरच पार पडेल. तो पहिल्या सामन्यापासून संघासोबत उपलब्ध असेल, असा विश्वास दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने व्यक्त केला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार अक्षर पटेल, क्रिकेट डायरेक्टर वेणुगोपाल राव आणि मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मिचेल स्टार्कच्या उपलब्धते बद्दल महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.
IPL फॅन पार्कची घोषणा; 15 शहरांमध्ये घ्या स्टेडियमसारखा अनुभव, नागपूर आणि रत्नागिरीचाही समावेश
स्टार गोलंदाजासंदर्भात काय म्हणाले प्रशिक्षक?
मुख्य प्रशिक्षक बदानी म्हणाले की, "आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून NOC ची वाट पाहत आहोत. ती मिळाल्यानंतरच तो नेमका कधी संघात सामील होईल हे स्पष्ट होईल. तोपर्यंत कोणतीही फ्रँचायझी काही करू शकत नाही." ते पुढे म्हणाले की स्टार्क सध्या गोलंदाजीचा सराव करत असून त्याच्या फिटनेसवर बोर्डाचे बारकाईने लक्ष आहे.
स्टार्क वेळेत न आल्यास पर्याय काय? अक्षर पटेलनं असं दिल उत्तर
जर स्टार्क १ एप्रिलला लखनौ विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल तर टी नटराजन याला संधी दिली जाईल का? असा प्रश्न अक्षर पटेलला विचारण्यात आला होता. यावर अक्षर पटेल म्हणाला की, "आता याचं उत्तर देणं कठीण आहे. NOC मिळाल्यास तो पहिल्या सामन्यापूर्वीही येऊ शकतो. टीम कॉम्बिनेशननुसार निर्णय घेतला जाईल. नटराजन चांगली कामगिरी करत आहे आणि पूर्णपणे फिट आहे."
IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू असलेला मिचेल स्टार्क मागील दोन हंगामापासून दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. या स्टार गोलंदाजासाठी दिल्ली फ्रँचायझी संघाने ११.७५ कोटी रुपये मोजले आहेत. २०२४ च्या हंगामात केकेआरनं त्याच्यासाठी २४.७५ कोटी मोजले होते. आतापर्यंत ५२ IPL सामन्यात त्याने ६५ विकेट्स घेतल्या आहेत.