Join us  

साहेबांचा पराभव, ऑस्ट्रेलियाचे निर्भेळ यश, अॅशेसची राख इंग्लंड परत मिळवणार का? 

अॅशेस म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमध्ये रंगणारे द्वंद्. ही फक्त क्रिकेट नाही तर प्रतिष्ठेची लढाई समजली जाते.  याच प्रतिष्ठेच्या लढाईत कांगारुंनं इंग्लडंचा दारुण पराभव केला.

By namdeo.kumbhar | Published: January 08, 2018 11:15 AM

Open in App

अॅशेस म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमध्ये रंगणारे द्वंद्. ही फक्त क्रिकेट नाही तर प्रतिष्ठेची लढाई समजली जाते.  याच प्रतिष्ठेच्या लढाईत कांगारुंनं इंग्लडंचा दारुण पराभव केला. मायदेशात झालेल्या 2017-18च्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा 4-0 च्या फरकानं दारुण पराभव केला. त्याबरोबरच कांगारुंनी 2015च्या पराभवाची परतफेडच केली म्हणावी लागेल. इंग्लंडसाठी अॅशेसमधील हा पराभव लाजीरवाणा ठरला आहे. 2015 मध्ये झालेल्या मालिकेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 3-0ने पराभव करत अॅशेसवर नाव कोरले. मात्र ती मालिका इंग्लंडमध्ये झाली होती. ऑस्ट्रेलियात 2010-11 मध्ये झालेल्या मालिकेत इंग्लंडने शेवटचा विजय मिळवला होता. त्यानंतर अद्याप एकदाही इंग्लंडला ऑस्ट्रेलियात विजय मिळवता आलेला नाही. आता ऑस्ट्रेलियातील विजयासाठी इंग्लंडला 2021 पर्यंत वाट पाहावी लागेल. 2019 मधील अॅशेस मालिका इंग्लंडमध्ये होणार आहे. 

( आणखी वाचा - अ‍ॅशेस मालिकेवर ऑस्ट्रेलियाचा कब्जा, इंग्लंडचा 4-0नं पराभव )

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अॅशेस ही सर्वात जुनी व मानाची मालिका आहे. अॅशेसचा अर्थ होतो राख. या दोन संघांमधील मालिका जिंकणाऱ्या संघाला राख असलेला कलश प्रदान करण्यात येतो. सर्वात पहिली ऍशेस मालिका 1882-83 साली ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली गेली. सध्या ऍशेस दोन वर्षातून एकदा खेळवली जाते व दोन्ही देश आलटुन पालटुन ह्या मालिकेचे आयोजन करतात. सर्वसाधारणपणे ऍशेस मालिकेत 5 कसोटी सामने असतात. जर मालिका बरोबरीत सुटली तर मागील विजयी टीमकडे ऍशेसचा चषक राहतो. 

( आणखी वाचा - अॅशेस सीरिज : मैदानाबाहेर 'भिडले' मिचेल जॉन्सन आणि केविन पिटरसन )

अॅशेसच्या इतिहासावर एक नजर टाकल्यास कांगारुंचाच दबदबा दिसून येतो. खरा पण इंग्लडंने तोडीसतोड तोड कामगिरी केली आहे. अॅशेसमधील 330 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या नावावर 135 विजय, तर इंग्लंडनं 106 कसोटी जिंकल्या आहेत 89 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. 1882 पासून आता पर्यंत 70 अशेस मालिका झाल्या आहेत. यामध्ये 33 वेळा ऑस्ट्रेलियानं आणि 32 वेळा इंग्लंडनं मालिका जिंकल्या आहेत. तर फक्त पाच मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.....पुढील 2019-20 मध्ये होणाऱ्या अॅशेस मालिकेवर इंग्लडं कब्जा करुन हिशेब चुकता करण्याचा पर्यत्न नक्कीच करेन. पण मायदेशातील विजयापेक्षा त्यांच्या भूमीत जाऊन पराभव करण्याची मजाच काही वेगळी असते. प्रत्येक संघाचे ते स्वप्नच असते. 

( आणखी वाचा - असं करणारा स्मिथ कसोटी इतिहासातला पहिला फलंदाज )

1882 मध्ये पहिल्या ऍशेस मालिकेत एकच सामना ओव्हल या मैदानावर खेळला गेला. या रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलिया ने पहिल्या डावात केवळ 63 धावा केल्या. पण इंग्लंडचाही संघ  केवळ 101 धावाच करु शकला. दुसऱ्या डावात देखील ऑस्ट्रेलिया संघ 122 पर्यत मजल मारु शकला. अखेर इंग्लंड ला विजयासाठी केवळ 85  धावाच हव्या होत्या. पण इंग्लंड फक्त 78 धावाची मजल मारु शकला. त्याचे अखेरचे 4 फलंदाज केवळ 2 धावांमध्ये बाद झाले. हा ऑस्ट्रेलिया चा इंग्लंडमधील पहिला विजय होता. इंग्लिश वुत्तपत्रांनी ह्या पराजयाचे वर्णन "ओव्हल येथे इंग्लंड च्या क्रिकेटचा मृत्यू झाला" असे केले होते.  या पराभवनंतर पुढील दौऱ्याला इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियात जाणार होता. त्यावेळी इंग्लंडमधल्या प्रसारमाध्यमांनी इंग्लंड संघाच्या त्या ऑस्ट्रेलियन दौऱ्याला अॅशेस परतफेड मोहीम असं नाव दिलं. पाहू आता आगामी अॅशेस मालिकेत इंग्लंड कशी कामगिरी करतो. साहेब अॅशेस परतफेड मोहीम फत्ते करतात की कांगारु आपले वर्चस्व कायम राखतात...हा येणारा काळच ठरवेल. शेवटी एकच ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन तर इंग्लंडला पुढील मालिकेसाठी शुभेच्छा...! 

टॅग्स :अॅशेस मालिकाइंग्लंडआॅस्ट्रेलिया