अॅशेस सीरिज : मैदानाबाहेर 'भिडले' मिचेल जॉन्सन आणि केविन पिटरसन

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेची अॅशेस मालिका सुरू झाली की मैदानावर आणि मैदानाबाहेरही तणाव पाहायला मिळतो. ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज मिचेल जॉन्सन आणि इंग्लंड क्रिकेट टीमचा माजी फलंदाज केविन पिटरसन यांच्यात मैदानात झालेले वाद कोण विसरेल... दोघांमध्ये अनेकदा वाद झाले आणि ते चांगलेच चर्चेत राहिले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 03:09 PM2017-11-30T15:09:37+5:302017-11-30T15:23:31+5:30

whatsapp join usJoin us
ashes tweet war mitchell johnson with kevin pietersen | अॅशेस सीरिज : मैदानाबाहेर 'भिडले' मिचेल जॉन्सन आणि केविन पिटरसन

अॅशेस सीरिज : मैदानाबाहेर 'भिडले' मिचेल जॉन्सन आणि केविन पिटरसन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई:  इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेची अॅशेस मालिका सुरू झाली की मैदानावर आणि मैदानाबाहेरही तणाव पाहायला मिळतो. ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज मिचेल जॉन्सन आणि इंग्लंड क्रिकेट टीमचा माजी फलंदाज केविन पिटरसन यांच्यात मैदानात झालेले वाद कोण विसरेल... दोघांमध्ये अनेकदा वाद झाले आणि ते चांगलेच चर्चेत राहिले. 

हे दोन्ही खेळाडू सध्या क्रिकेट खेळत नसले तरी दोघांमध्ये मैदानाबाहेर सोशल मीडियाच्या मैदानावर चांगलीच जुंपली आहे. ट्विटरवर झालेल्या या वादाचं कारण राहिलं ते म्हणजे अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना. या सामन्यावर तिस-या दिवशीच ऑस्ट्रेलियाने पकड मिळवली होती. ही संधी साधून जॉन्सनने पिटरसन आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांच्यावर निशाणा साधला. 

''केपी (केविन पीटरसन)आणि मायकल ( माइकल वॉन), इंग्लंडचे जलदगती गोलंदाज 140 पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करण्यात अपयशी ठरत आहेत. इंग्लंडचे सर्व गोलंदाज नव्या चेंडूनेही मध्यमगती गोलंदाजांसारखे गोलंदाजी करतायेत... तुमचे चारही गोलंदाज आधीच पराभव मान्य करू शकतात...'' असं बोचरं ट्विट मिचेल जॉन्सनने केलं होतं. 




त्याच्या या ट्विटला पिटरसनने प्रत्युत्तर दिलं. ''मिचेल हे ट्विट तू केलं आहेस का, जर तू हे ट्विट केलं असेल तर तुला स्वतःला सांभाळण्याची गरज आहे...जर तुझ्या मॅनेजमेंटने हे ट्विट केलं असेल तर अशाप्रकारच्या फालतू गोष्टी करू नये असं त्यांना सांग अथवा त्यांना काढून टाक...''




पिटरसनच्या या ट्विटला जॉन्सनने दुर्लक्षित केलं आणि इंग्लंड चाहत्यांची खिल्ली उडवत आणखी एक ट्विट केलं. त्यामुळे पिटरसनचा रागाचा पारा चांगलाच चढला आणि त्याने जॉन्सनला थेट ब्लॉक केलं.



ब्रिस्‍बेन झालेल्या अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत 10 विकेटने विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.   

Get Latest Marathi News, Mumbai News, Pune News, Maharashtra News Here on Lokmat.com

Web Title: ashes tweet war mitchell johnson with kevin pietersen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.