Join us

भारताला हरवा, बदला घ्या! ढाक्याला येईन अन्...; पाकिस्तानी अ‍ॅक्ट्रेसची बांग्लादेशला मोठी ऑफर

ही बोचरी हार आधीच कंगाल झालेले पाकिस्तानी काही सहन करू शकलेले नाहीएत. पाकिस्तानी अॅक्ट्रेस आता शब्द देऊन बसली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 12:38 IST

Open in App

भारताने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या तोंडचा फेस काढला होता. गेल्या शनिवारी झालेल्या मॅचमध्ये पाकिस्तानला लाजिरवाना पराभव पत्करावा लागला होता. त्यांचे ८ खेळाडू अवघ्या ३६ धावांत तंबूत गेले होते. रोहित शर्माच्या संघाने पाकिस्तानला ७ गडी राखून धुळ चारली होती. ही बोचरी हार आधीच कंगाल झालेले पाकिस्तानी काही सहन करू शकलेले नाहीएत. 

यातच आता पाकिस्तानची आघाडीची हिरोईन बांग्लादेशींना मोठा शब्द देऊन बसली आहे. आज पुण्यात होणाऱ्या भारत वि. बांग्लादेश मॅचमध्ये भारताला हरवून बदला घेण्याचे आवाहन तिने बांग्लादेशला केले आहे. भारताला हरविल्यास मी ढाक्याला येईन आणि बांग्ला मुलासोबत डिनर डेटला जाईन अशी खुली ऑफर या अ‍ॅक्ट्रेसने देऊन टाकली आहे. 

या सुंदरीला पाकिस्तानच्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे. पाकिस्तान देखील तो घेईल असे तिला वाटत आहे. परंतू, यासाठी पाकिस्तानला सेमीमध्ये जावे लागणार आहे. पाकिस्तानच्या या अ‍ॅक्ट्रेसचे नाव सेहर शिनवारी असे आहे. १५ ऑक्टोबरला हे तिने ट्विट केले आहे. या ट्विटला जवळपास २५ हजारहून व्ह्यूव्ज आले आहेत. 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशपाकिस्तानवन डे वर्ल्ड कप