पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यानंतर जेव्हा चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar) यानं गर्लफ्रेंड जया भारद्वाजला प्रपोज केलं, तेव्हा या सर्वामागे धोनीचा प्लान असल्याचे समोर आले. पंजाबविरुद्धचा सामना संपताच चहर VIP स्टँडमध्ये गेला आणि गुडघ्यावर बसून जयाला लग्नाची मागणी घातली. त्यानं तिथेच साखरपुडाही उरकला आणि हे साऱ्या जगानं पाहिलं. या सर्व फिल्मी स्टाईल प्रपोजची प्लानिंग कॅप्टन कूल धोनीनं केली होती. दीपक चहरनं काही वेगळाच प्लान आखला होता, परंतु त्यानं यासंदर्भात धोनीला सांगितले आणि मग साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात चहरनं गर्लफ्रेंडला स्टेडियमवरच प्रपोज केलं.
दीपक चहरनं गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी धोनीचा सल्ला घेतला. CSKचा गोलंदाज जया भारद्वाजला प्ले ऑफ सामन्यानंतर प्रपोज करणार होता, परंतु याबाबत जेव्हा त्यानं धोनीकडे सल्ला मागितला. तेव्हा धोनीला चहरचा प्लान काही आवडला नाही. त्यानं चहरला अखेरच्या साखळी फेरीच्या सामन्यात गर्लफ्रेंडला प्रपोज करण्याचा सल्ला चहरला दिला.
जागरण मध्ये छापलेल्या वृत्तानुसार दीपक चहरच्या वडीलांनी या सर्वामागे धोनीचा प्लान असल्याचे सांगितले. धोनीनं सांगितल्यानंतरच चहरनं प्ले ऑफ सामन्याऐवजी साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात गर्लफ्रेंडला प्रपोज केलं... आता लवकरच दोन्ही कुटुंब एकत्र येऊन लग्नाची तारीख ठरवतील, असेही त्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या
जिला समजत होतो फॉरेनर निघाली दिल्लीकर; दीपक चहरच्या बहिणीनं सांगितलं वहिनीचं नाव!
आयोजकांनी VIP पाहुणी म्हणून ओळख करून दिली ती निघाली दीपक चहरची गर्लफ्रेंड, पाहा पूर्ण Video