‘डिव्हिलियर्स आमच्या काळातील सर्वोत्तम खेळाडू’

विराट कोहलीचीे भावनिक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 05:30 IST2021-11-20T05:30:17+5:302021-11-20T05:30:46+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
‘De Villiers is the best player of our time’, virat kohli | ‘डिव्हिलियर्स आमच्या काळातील सर्वोत्तम खेळाडू’

‘डिव्हिलियर्स आमच्या काळातील सर्वोत्तम खेळाडू’

जोहान्सबर्ग : एबी. डिव्हिलियर्सच्या  निवृत्तीच्या तडकाफडकी निर्णयामुळे आरसीबीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.   नुकताच कर्णधार पदावरून पायउतार झालेल्या विराट कोहलीलाही या निर्णयामुळे दु:ख झाले.  विराट आणि डिव्हिलियर्सची जोडी सर्वात चर्चेतील जोड्यांपैकी एक आहे. मात्र यापुढे हे दोघे ड्रेसिंग रुम शेअर करणार नाहीत. डिव्हिलियर्सच्या निवृत्तीसंदर्भात विराटने  ट्विटरवरून भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.

कोहली म्हणाला, ‘आमच्या काळातील सर्वोत्तम खेळाडूसाठी आणि मी आतापर्यंत भेटलेल्या सर्वात प्रेरणादायी व्यक्तीसाठी. भावा तू आरसीबीला जे काही दिले आहे त्यासाठी तुला नक्कीच अभिमान वाटला पाहिजे. आपले नाते   खेळापलीकडचे  आहे आणि ते कायमच राहील,’   निर्णयाचा माझ्या मनाला फार त्रास होतो आहे, पण  तू तुझ्यासाठी आणि कुटुंबासाठी सर्वोत्तम निर्णय घेतला घेतला. जसा तू नेहमीच घेतोस. खूप सारे  प्रेम.’
श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने याने आधुनिक क्रिकेटमधील सर्वाधिक पसंतीचा आणि प्रशंसेची पावती मिळविणारा खेळाडू, या शब्दात डिव्हिलियर्सचे कौतुक करीत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: ‘De Villiers is the best player of our time’, virat kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.