Join us  

DC vs KXIP Latest News : तीव्र वेदनेनं मैदान सोडणारा आर अश्विन पुढील सामन्यात खेळणार, पण...

DC vs KXIP Latest News : सामना जरी दिल्लीने जिंकला असला, तरी अश्विन खांद्याच्या दुखावल्याने केवळ एक षटक टाकून मैदानाबाहेर गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 3:33 PM

Open in App

रविवारी झालेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारत किंग्ज ईलेव्हन पंजाबचा थरारकरीत्या पराभव केला. सातत्याने पारडे झुकत राहिलेल्या या सामन्यात अष्टपैलू मार्कस स्टोईनिस विजयाचा शिल्पकार ठरला. त्याच्यासह कर्णधार श्रेयस अय्यर, अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांचेही मोलाचे योगदान ठरले. सामना जरी दिल्लीने जिंकला असला, तरी अश्विन खांद्याच्या दुखावल्याने केवळ एक षटक टाकून मैदानाबाहेर गेला. त्यामुळे दिल्लीकरांचे टेन्शन वाढले. ( IPL 2020 Live Updates, Click here)  

 ...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी

अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा KXIPला फटका; वीरू, इरफाननं काढले जाहीर वाभाडे!

अश्विनने या सामन्यात केवळ एक षटक गोलंदाजी केली. मात्र या सहा चेंडूंमध्येही त्याने करुण नायर आणि निकोलस पूरन असे २ महत्त्वपूर्ण बळी घेत दिल्लीच्या विजयात महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्यामुळे आता पुढील सामन्यात अश्विन खेळणार की नाही, याची चिंता दिल्लीकरांना आहे. ( IPL 2020 Live Updates, Click here)  

अश्विन पुढील सामन्यात नक्की खेळेल, अशी माहितीही आता दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने दिली. पंजाबविरुद्ध विजय मिळवल्यानंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अय्यरने अश्विनविषयी सांगितले की, ‘सामन्यानंतर मी अश्विनशी बोललो आणि त्याने स्वत:हून मी पुढील सामना खेळणार असल्याचे सांगितले. पण सरतेशेवटी त्याच्या खेळण्याबाबतचा अंतिम निर्णय संघाचे फिजिओ घेतील. त्यांच्या निर्णयानंतरच अश्विनचे पुढील सामन्यात खेळणे निश्चित होईल.’ ( IPL 2020 Live Updates, Click here)  

आर अश्विननं ( Ashwin) KXIPला दिले धक्के, पण दुखापतीमुळे मैदान सोडलेKL Rahul आणि मयांक अग्रवाल KXIPसाठी सलामीला आले. राहुलनं फटकेबाजी करून 21 धावा केल्या, परंतु मोहित शर्माच्या सुरेख चेंडूने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आर अश्विननं ( Ashwin) एकाच षटकात दिल्लीला दोन धक्के दिले. निकोलस पुरनला सहजतेनं त्यानं त्रिफळाचीत केलं. करुण नायरही त्याच्या गोलंदाजीवर फसला. अश्विनने सहाव्या षटकात KXIPला दोन धक्के दिले, परंतु अखेरच्या चेंडूवर एक धाव वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःला दुखापतग्रस्त करून घेतले. त्याच्या डाव्या खांद्याला ही दुखापत झाली असून त्याला प्रचंड वेदना होताना पाहायला मिळाल्या. त्यानं तसेच मैदान सोडले होते. ( IPL 2020 Live Updates, Click here)  

अन्य म्हत्त्वाच्या बातम्या 

राजस्थान रॉयल्सला धक्का; बेन स्टोक्ससह संघातील 3 तगडे खेळाडू पहिल्याच सामन्याला मुकणार 

नशीब! मॅक्क्युलमला बॉलिंग करावी लागणार नाही; सांगतोय सर्वात महागडा बॉलर  

सुपरओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद

टॅग्स :IPL 2020आर अश्विनकिंग्स इलेव्हन पंजाबदिल्ली कॅपिटल्स