Join us

IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)

चमीराचा कॅच पाहिल्यावर दोन श्रीलंकन खेळाडूंमध्ये सर्वोत्तम कॅचची स्पर्धा सुरु असल्याचे दिसून येते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 22:30 IST

Open in App

दिल्ली कॅपिटल्स (DC) च्या संघातील श्रीलंकन जलदगती गोलंदाज दुष्मंथा चमीरा याने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम नजराणा पेश केला. त्याने  सीमारेषेवर टिपलेल्या झेलसह इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या हंगामातील आणखी एक सर्वोत्तम कॅच पाहायला मिळाला. कमालीचा योगायोग म्हणजे या आधी सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातील श्रीलंकन फलंदाजाने आपल्या जबरदस्त कॅचसह लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले होते. चमीराचा कॅच पाहिल्यावर दोन श्रीलंकन खेळाडूंमध्ये सर्वोत्तम कॅचची स्पर्धा सुरु असल्याचे दिसून येते.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कॅच घेतल्यावर तो स्वत:ही झाला आश्चर्यचकित

कोलकाता नाईट रायडर्सच्या शेवटच्या षटकात दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल स्टार्क गोलंदाजी करत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर  अनुकुल रॉयनं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक आकर्षक फटका मारला. या चेंडूवर त्याला किमान ४ धावा सहज मिळाल्या असत्या. पण चमीरानं  हवेत उडी मारत एक कमालीचा झेल टिपत धावा वाचवण्यासोबत संघाला एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. हा झेल टिपल्यावर स्वत: चमीराही आश्चर्यचकित झाल्याचे पाहायला मिळाले. 

 IPL 2025 : दोन्ही हातांनी गोलंदाजी करणाऱ्या पठ्ठ्यानं घेतला IPL मधील सर्वोत्तम कॅच; इथं पाहा व्हिडिओ

गोलंदाजीत महागडा ठरला, पण क्षेत्ररक्षणात दाखवला जलवा

अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातील एकालाही अर्धशतक झळकावता आले नाही. पण अंगकृष्ण रघुवंशी याने ३२ चेंडूतील केलेल्या ४४ धावांच्या खेळीशिवाय अन्य फलंदाजांनी उपयुक्त धावा केल्यामुळे KKR च्या संघाने निर्धारित २० षटकात ९ बाद  २०४ धावांपर्यंत मजल मारली. मिचेल स्टार्कने दिल्लीच्या संघाकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय विपराज आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी २-२ तर चमीरानं ३ षटकात ४६ धावा खर्च करत एक विकेट घेतली. गोलंदीजीत तो महागडा ठरला. पण कॅचसह त्याने मैफिल लुटल्याचे पाहायला मिळाले.

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५दिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्सव्हायरल व्हिडिओइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट