Join us  

On This Day : सौरव गांगुली-राहुल द्रविड यांचा पराक्रम; वन डे क्रिकेटमध्ये प्रथमच झालेली त्रिशतकी भागीदारी

On This Day in 1999 : Sourav Ganguly  and Rahul Dravid put together a 318-run stand   भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी १९९९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत आजच्याच दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 11:53 AM

Open in App

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी १९९९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत आजच्याच दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली होती. वन डे क्रिकेटमध्ये त्रिशतकी भागीदारी करणारी ही पहिलीच जोडी ठरली होती.  १९९९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात या दोघांनी तुफान फटकेबाजी केली होती. इरफान पठाणच्या पत्नीच्या फोटोवरून सुरू झालाय नवा वाद; क्रिकेटपटू म्हणतो, मी तिचा मालक नाही, जोडीदार!

श्रीलंकेचा कर्णधार अर्जुन रणतुंगा यानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चामिंडा वासनं भारताचा सलामीवीर सदगोपण रमेश याला बाद केले. त्यानंतर द्रविड व गांगुली या जोडीनं आक्रमक खेळ केला. मुथय्या मुरलीधरन यालाही या दोघांना रोखता आले नाही. द्रविडनं सलग दुसऱ्या शतकाची नोंद केली, तर गांगुलीनं ११९ चेंडूंत शतक पूर्ण केलं आणि त्यानंतर पुढील ३९ चेंडूंत त्यानं १८३ धावांचा पल्ला गाठला.   द्रविड व गांगुली यांनी ४५ षटकांत ३१८ धावांची भागीदारी केली. या जोडीनं मोहम्मद अझरुद्दीन व अजय जडेजा ( वि. झिम्बाब्वे, १९९७-९८) यांचा २७५ धावांचा विक्रम मोडला. गांगुलीनं १५८ चेंडूंत १८३ धावा केल्या आणि वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये ही आजही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. गॅरी कर्स्टन यांनी १९९६च्या वर्ल्ड कपमध्ये UAEविरुद्ध नाबाद १८८ धावा केल्या होत्या. भारतानं ६ बाद ३७३ धावा केल्या. वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सर्वोत्तम धावसंख्या होती, परंतु २००७मध्ये भारतानं बर्मुडाविरुद्ध ५ बाद ४१३ धावा करून हा विक्रमही मोडला. द्रविडनं १२९ चेंडूंत १४५ धावा केल्या. 

पाहा व्हिडीओ..

टॅग्स :राहूल द्रविडसौरभ गांगुलीभारत विरुद्ध श्रीलंका