Join us

डेव्हिड वॉर्नर होतोय ट्रोल... कसा आणि कुठे ते वाचा

इंग्लंड आणि पाकिस्तानचा सामना आणि ट्रोल होतोय वॉर्नर, असं कसं, हा विचार तुम्ही करत असाल. पण याच सामन्यामध्ये वॉर्नर ट्रोल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 20:09 IST

Open in App
ठळक मुद्देकोण आणि कुठे वॉर्नरला ट्रोल केलं जातंय, हे प्रश्न तुम्हाला पडले असतीलंच.

लंडन : दक्षिण आफ्रिकेत चेंडूशी छेडछाड केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घालती आहे. सध्याच्या घडीला हे प्रकरण शांत झालेलं आहे, पण तरीही वॉर्नर आता ट्रोल होतोय. कोण आणि कुठे वॉर्नरला ट्रोल केलं जातंय, हे प्रश्न तुम्हाला पडले असतीलंच.

सध्याच्या घडीला हेडिंग्ले येथे इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. आजपासूनच हा कसोटी सामना सुरु झाला. पण इंग्लंड आणि पाकिस्तानचा सामना आणि ट्रोल होतोय वॉर्नर, असं कसं, हा विचार तुम्ही करत असाल. पण याच सामन्यामध्ये वॉर्नर ट्रोल झाला आहे.

या सामन्यात एक चाहता वॉर्नरचे नाव असलेलं टी-शर्ट परीधान करून आला, त्याचबरोबर त्याने ऑस्ट्रेलियाची कॅपही परीधान केली होती. सुरुवातीला ही व्यक्ती वॉर्नरची फॅन असेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण त्याने हातामध्ये सँड पेपर पकडलेला लोकांनी पाहिला आणि तो वॉर्नरला ट्रोल करत असल्याचे समजले.

दक्षिण आफ्रिकेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने सँड पेपरने चेंडूशी छेडछाड करायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हा चाहता वॉर्नरची थट्टा करत असल्याचे पुढे आले आहे. इंग्लंडच्या बार्मी-आर्मीने त्या चाहत्याचा फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरक्रिकेटचेंडूशी छेडछाड