Join us
Daily Top 2Weekly Top 5

डेव्हिड वॉर्नरचा पाय खोलात; पुन्हा एकदा चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप

चेंडूशी छेडछाड मी कशी करायचो, हे दस्तुरखुद्द वॉर्नरनेच सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 20:20 IST

Open in App

मँचेस्टर, अ‍ॅशेस 2019 : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे वृत्त आहे. कारण इंग्लंडच्या एका माजी कर्णधाराने वॉर्नरवर पुन्हा एकदा चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर वॉर्नर चेंडूशी छेडछाड कसा करायचा, हेदेखील त्याने सांगितले आहे.

दक्षिण आफ्रिकेत वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांच्यावर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप लावण्यात आला होता. या आरोपांमध्ये तथ्य असल्यामुळे या दोघांवर एका वर्षांची बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा एकदा वॉर्नरवर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप केला जात आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने हा आरोप केला आहे. या आरोपांमध्ये एक धक्कादायक खुलासा कुकने केला आहे. चेंडूशी छेडछाड मी कशी करायचो, हे दस्तुरखुद्द वॉर्नरनेच मला सांगितल्याचे त्याने सांगितले आहे. आता ही गोष्ट जर आयसीसी आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने गांभीर्याने घेतली तर वॉर्नरवर मोठी कारवाई होऊ शकते.

कुकने याबाबतचा एक किस्साही सांगतिला आहे. तो म्हणाला की, " वॉर्नरने बीअर प्यायलावर चेंडूशी छेडछाड कशी हे मला सांगितले होते. स्थानिक सामन्यांमध्ये वॉर्नर हा दोन्ही हातांना पट्ट्या बांधायचा. या दोन्ही पट्ट्यांमध्ये धातूचा तुकडा ठेवलेला असायचा. वॉर्नर या पट्ट्यांवर चेंडू घासायचा आणि छेडछाड करायचा. हे मला सारे वॉर्नर सांगत होता. त्यानंतर आमचे बोलणे ऐकून स्मिथ आमच्याजवळ आला आणि वॉर्नरला म्हणाला, तू ही गोष्ट सांगायला नको होतीस. त्यानंतर आमचं बोलणं थांबलं."

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरचेंडूशी छेडछाडअ‍ॅशेस 2019