डार्विन : चेंडूशी छेडछाड प्रकरणात निलंबित झालेला आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार डेविड वॉर्नर याने आॅस्ट्रेलियातच पुनरागमन केले आहे. डार्विनमध्ये मर्यादित षटकांच्या स्ट्राईक लीगमध्ये एक दिवसीय सामन्यात त्याने ३६ धावा केल्या. वॉर्नर याने ५० षटकांच्या सामन्यात सिटी सायक्लोन्सकडून खेळला. हा सामना मरारा क्रिकेट मैदानात घेण्यात आला. नॉर्दन ट्राईड विरोधात हा सामना होता.चेंडूशी छेडछाड प्रकरणातील दुसरा खेळाडू कॅमेरुन व्हाईट हा देखील बाजूच्याच मैदानात खेळत होता. मार्चमध्ये केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी सामन्यात वॉर्नर आणि आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांच्यावर १२ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. तर बेनक्राफ्टला ९ महिने निलंबित करण्यात आले होते. हे निलंबन आंतरराष्ट्रीय सामने आणि आॅस्ट्रेलियातील मुख्य देशांतर्गत स्पर्धांसाठी लागू करण्यात आले आहे. मात्र तीन स्वतंत्र लीगमध्ये हे खेळाडू खेळू शकतात.हे खेळाडू सध्या आॅस्ट्रेलियातील क्लब क्रिकेटमध्ये खेळत आहेत. त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय आणि इतर प्रकारचे क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. वॉर्न आणि स्मिथ नुकतेच कॅनडात टी२० स्पर्धेत खेळले होते. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- डेविड वॉर्नरने केले आॅस्ट्रेलियात पुनरागमन
डेविड वॉर्नरने केले आॅस्ट्रेलियात पुनरागमन
चेंडूशी छेडछाड प्रकरणात निलंबित झालेला आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार डेविड वॉर्नर याने आॅस्ट्रेलियातच पुनरागमन केले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 07:08 IST