Join us

आता टी-२० क्रिकेटमध्ये विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!

David Warner overtakes Virat Kohli: द हंड्रेड स्पर्धेत लंडन स्पिरिटचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 14:59 IST

Open in App

इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या द हंड्रेड स्पर्धेत लंडन स्पिरिटचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. सोमवारी (११ ऑगस्ट २०२५) त्याने मँचेस्टर ओरिजिनल्स विरूद्धच्या सामन्यात ७१ धावांची खेळी केली. या कामगिरीसह त्याने टी-२० स्वरूपात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकले.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल १४ हजार ५६२ धावांसह पहिल्या स्थानावर आहे. या यादीत कायरन पोलार्ड हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये १३ हजार ८५४ धावा केल्या आहेत. त्यानंतर अ‍ॅलेक्स हेल्स (१३ हजार ८१४ धावा) तिसऱ्या, शोएब मलिक (१३ हजार ५७१ धावा) चौथ्या स्थानावर आहे. आता डेव्हिड वॉर्नर या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये ४१९ सामन्यांमध्ये १३ हजार ५४५ धावा केल्या आहेत.

विराट कोहली टॉप-५ मधून बाहेर

विराट कोहलीची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. विराटने टी-२० क्रिकेटमध्ये ४१४ सामन्यांत १३ हजार ५४३ धावा केल्या आहेत. शिवाय, डेव्हिड वॉर्नरकडे शोएब मलिकला मागे टाकण्याची संधी असेल. शोएब मलिकला मागे टाकण्यासाठी त्याला आणखी २७ धावांची गरज आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

१) ख्रिस गेल: १४ हजार ५६२ धावा२) किरॉन पोलार्ड: १३ हजार ८५४ धावा ३) अ‍ॅलेक्स हेल्स: १३ हजार ८१४ धावा४) शोएब मलिक: १३ हजार ५७१ धावा५) डेव्हिड वॉर्नर: १३ हजार ५४५ धावा६) विराट कोहली: १३ हजार ५४३ धावा

डेव्हिड वॉर्नरची टी-२० क्रिकेटमधील कामगिरी

डेव्हिड वॉर्नरने टी-२० क्रिकेटमध्ये ४१९ सामन्यातील ४१८ डावांमध्ये ३६.८० च्या सरासरीने १३ हजार ५४५ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर ११३ अर्धशतके आणि ८ शतकांची नोंद आहे. आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद १३५ आहे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये १ हजार ३८८ चौकार आणि ४७७ षटकार मारले. या फॉरमेटमध्ये तो ५० वेळा नाबाद राहिला आहे.

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरविराट कोहलीख्रिस गेल