Join us
Daily Top 2Weekly Top 5

David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?

David Warner Arrested: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरला पोलिसांनी अटक केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 18:09 IST

Open in App

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर मद्यपान करून गाडी चालवल्याचा आरोप आहे. या गंभीर प्रकारामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अटकेनंतर वॉर्नरला जामिनावर सोडून देण्यात आले असले तरी त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होण्याची दाट शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या माहितीनुसार, ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास सिडनीतील मालाबार रोडवर पोलीस रँडम ब्रेथ टेस्टिंग करत होते. यावेळी वॉर्नरची कार तपासणीसाठी थांबवण्यात आली. प्राथमिक तपासणीत त्याने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन मारौब्रा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉर्नरच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण (BAC) ०.१०४ इतके आढळले आहे. ऑस्ट्रेलियातील कायदेशीर मर्यादेपेक्षा (०.०५) हे प्रमाण दुप्पट आहे. यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.

दरम्यान, अटकेनंतर वॉर्नरला जामिनावर सोडून देण्यात आले असले तरी, त्याला आता न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार आहेत. या प्रकरणी त्याला ७ मे २०२६ रोजी सिडनीतील डाऊनिंग सेंटर लोकल कोर्टमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या गुन्ह्यामुळे त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डेव्हिड वॉर्नर सध्या पाकिस्तान सुपर लीग मध्ये कराची किंग्स संघाचे नेतृत्व करत आहे. लीगमध्ये मिळालेल्या एका आठवड्याच्या सुट्टीत तो सिडनीला आपल्या घरी आला होता, तेव्हा ही घटना घडली. सध्या तरी त्याच्यावर कोणतेही प्रवासाचे निर्बंध नसल्याने, तो उर्वरित सामने खेळण्यासाठी पुन्हा पाकिस्तानला रवाना झाला आहे. ९ एप्रिल रोजी त्याचा संघ पेशावर झल्मीविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : David Warner Arrested: Cricket Star Faces Drunk Driving Charges

Web Summary : Australian cricketer David Warner was arrested in Sydney for drunk driving after a random breath test showed his BAC exceeded legal limits. He was released on bail and faces a court hearing, potentially losing his driver's license. He is currently playing in the Pakistan Super League.
टॅग्स :डेव्हिड वॉर्नरऑफ द फिल्डअटक