Join us  

जगात भारी, डेव्हिड वॉर्नरची कामगिरी! असा विक्रम जो विराट कोहलीसह कोणालाच नाही जमला

ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात डेव्हिड वॉर्नरने ( David Warner ) विश्वविक्रमी कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 3:05 PM

Open in App

Australia vs West Indies T20I : ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात डेव्हिड वॉर्नरने ( David Warner ) विश्वविक्रमी कामगिरी केली. डेव्हिड वॉर्नरचा हा ऑस्ट्रेलियाकडून १००वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना ठरला आणि एकाच संघाकडून तिन्ही फॉरमॅट ( कसोटी, वन डे व ट्वेंटी-२० ) मध्ये १०० हून अधिक सामने खेळणारा तो जगातील तिसरा ( विराट कोहली व रॉस टेलर) फलंदाज ठरला. पण, या विराट व टेलर यांना जे जमले नाही, ते वॉर्नरने या सामन्यात करून दाखवले.

नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वॉर्नर आणि जॉश इंग्लिस यांनी पहिल्या ८ षटकांत ९३ धावा कुटल्या. जेसन होल्डरने ही जोडी तोडली आणि इंग्लिसने २५ चेंडूंत ५ चौकार व १ षटकाराने ३९ धावा केल्या. पण, वॉर्नरने २२ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि विश्वविक्रमाला गवसणी घातली. कर्णधार मिचेल मार्श ( १६), ग्लेन मॅक्सवेल ( १०) व मार्कस स्टॉयनिस ( ९) यांना अपयश आले. वॉर्नर ३६ चेडूंत १२ चौकार व १ षटकारासह ७० धावांवर बाद झाला. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये १००व्या सामन्यात ५०+ धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. त्याने १००व्या कसोटीत द्विशतक आणि १००व्या वन डे सामन्यात शतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियाने २० षटकांत  ७ बाद २१३ धावा केल्या आहेत. 

वॉर्नरने ११२ कसोटीत २६ शतकं व ३७ अर्धशतकांसह ८७८६ धावा केल्या, वन डेत १६१ सामन्यांत २२ शतकं व ३३ अर्धशतकांसह ६९३२ धावा केल्या आहेत. ट्वेंटी-२०त १०० सामन्यांत ३०७० धावा त्याच्या नावावर आहेत आणि त्यात १ शतक व २४ अर्धशतकं आहेत.

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरआॅस्ट्रेलियावेस्ट इंडिजविराट कोहली