Join us  

IPL 2020 टायटल स्पॉन्सरच्या शर्यतीत पतंजली; दंत कांती फॅन बॉक्स अन् च्यवनप्राश षटकार, पडतोय मिम्सचा पाऊस 

VIVOच्या माघारीनंतर आता टायटल स्पॉन्सरच्या शर्यतीत बाबा रामदेव यांची पतंजली कंपनी उतरण्याचा विचार करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 4:27 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) टायटल स्पॉन्सर VIVOनं यंदा माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोज नवनवीन नावं समोर येत आहेत. भारत-चीन सीमेवरील वादानंतर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळावरही ( बीसीसीआय) दबाव वाढत होता. त्यामुळे त्यांना यंदा आयपीएलच्या टायटल स्पॉन्सर म्हणून VIVOनं माघार घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता IPL 2020 ही आत्मनिर्भर होण्याच्या मार्गावर आहे. VIVOच्या माघारीनंतर आता टायटल स्पॉन्सरच्या शर्यतीत बाबा रामदेव यांची पतंजली कंपनी उतरण्याचा विचार करत आहे. (Patanjali IPL 2020)

 ''यंदाच्या आयपीएलसाठी टायटल स्पॉन्सरशीप मिळवण्याचा आम्ही विचार करत आहोत. पतंजलीला जागतिक बाजारात ओळख मिळावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे,''असे पतंजलीचे प्रवक्ता एस के तिजरवाल यांनी इकॉनॉमिक टाईम्सला सांगितले. बीसीसीआयकडे ते लवकरच प्रस्तावही पाठवणार आहेत. ''आयपीएलचे टायटल स्पॉन्सरचे हक्क मिळवल्यास, त्याचा फायदा आयपीएलपेक्षा त्या कंपनीलाच होणार आहे. तसेच भारताच्या आत्मनिर्भर बनण्याच्या निर्धारालाही मोठे प्रोत्साहन मिळेल, असे ब्रँड तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं.  (Patanjali IPL 2020) 

यावरून नेटिझन्स सूसाट सुटले आहेत... Vivo India ने 2018मध्ये 2199 कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. त्यानुसार आयपीएलला एका वर्षाला Vivoकडून 440 कोटी मिळतात. Vivoची तीन वर्षांचा करार अजूनही शिल्लक आहे. त्यानुसार 2021, 2022 आणि 2023ला Vivo पुन्हा आयपीएलचे टायटल स्पॉन्सर म्हणून परतणार आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

गरूडाच्या पंखांखाली दडलंय कोण? वन अधिकाऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर शोधता सापडेना

बाबोss... 18 कॅरेट सोनं, 3600 हिरे; तयार होतोय 11 कोटींचा शाही 'मास्क'!

हसीन जहाँनं मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदत, म्हणाली... 

IPL 2020 होणार आत्मनिर्भर!; बाबा रामदेव यांची कंपनी 'पतंजली' उतरली टायटल स्पॉन्सर्सच्या शर्यतीत

टीम इंडियातील आणखी एक सदस्य पॉझिटिव्ह; एकूण सहा जणांना कोरोना

विराट, रोहित अन् धोनीची लॉकडाऊनमध्ये हवा; जागतिक अभ्यासातून समोर आली मोठी आकडेवारी

टॅग्स :आयपीएल 2020पतंजलीरामदेव बाबा