Danish Malewar First Cricketer From Vidarbha To Score A Century On Debut In The Duleep Trophy : दुलीप करंडक स्पर्धेतील सलामीच्या लढतीत विदर्भकर पठ्ठ्यानं पहिला दिवस गाजवला. उत्तर विभाग संघाकडून (Central Zone) मैदानात उतरलेल्या दानिश मालेवार (Danish Malewar) याने ईशान्य विभाग (North East Zone) संघाविरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवसाअखेर नाबाद १९८ धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवसाच्या खेळात दोन धावा करत त्याला ऐतिहासिक द्विशतक साजरे करण्याची संधी आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन शतकवीरांच्या जोरावर पहिल्या दिवशी उभारल्या ४३२ धावा
बंगळुरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेंस बी मैदानातील सामन्यात ईशान्य विभाग संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना उत्तर विभाग संघाचा कर्णधार रजत पाटीदारसह दानिश मालेवारच्या भात्यातून मोठी खेळी पाहायला मिळाली. शतकी खेळीनंतर कॅप्टन माघारी फिरल्यावर दानिश मालेवारनं सामन्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेत १९८ धावा कुटल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर उत्तर विभाग संघाने पहिल्या दिवसाअखेर २ बाद ४३२ धावा केल्या होत्या.
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
कोण आहे दानिश मालेवार? पदार्पणाच्या सामन्यात विक्रमी शतक; आता द्विशतकावर नजरा
दानिश मालेवार हा विदर्भातील नागपूरमधील क्रिकेटर आहे. विदर्भ संघाकडून खेळणाऱ्या २१ वर्षीय बॅटरला पहिल्यांदाच दुलीप करंडक स्पर्धेत उत्तर विभाग संघाकडून संधी मिळाली अन् त्याने या संधीच सोन करुन दाखवलं. दुलीप करंडक स्पर्धेत पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी करणारा तो पहिला विदर्भकर ठरलाय. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी तो १९८ धावांवर खेळत होता. २ धावा करताच तो द्विशतकासह आणखी एक विक्रम सेट करेल.
रणजी स्पर्धेत धमक दाखवून दुलीप करंडक स्पर्धेत एन्ट्री
२०२४ मध्ये दानिश याने विदर्भ संघाकडून रणजी स्पर्धेत पदार्पण केले. वयाच्या २१ व्या वर्षी तो संघाचा महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. यंदाच्या रणजी हंगामातच त्याच्या भात्यातून प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक आले होते. नागपूरच्या मैदानात केरळ विरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने नाबाद १३८ धावांची खेळी करत संघाला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. होती. मालेवारनं ९ सामन्यात ५२ च्या सरासरीसह रणजी स्पर्धेत ७८३ धावा केल्या आहेत.
Web Title: Danish Malewar First Cricketer From Vidarbha To Score A Century On Debut In The Duleep Trophy Now Eyes On Double Century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.