Join us
Daily Top 2Weekly Top 5

'Captain Cool' धोनीचा खतरनाक स्टंट; तुम्ही पण ट्राय कराच 

इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशात परतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर अधिकच चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 09:08 IST

Open in App

रांची: इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशात परतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर अधिकच चर्चेत आहे. इंग्लंड दौऱ्यावर दाढी वाढलेला म्हातारा दिसणारा धोनी भारतात परतताच तरणाबांड झालेला पाहायला मिळाला. त्यानंतर एका लग्न सोहळ्यातील त्याच्या 'कुल लुक'ने आणि मित्रांसोबतच्या बाथरुम व्हिडीओने तो चर्चेत राहिला. 'Captain Cool' धोनी पुन्हा चर्चेत आहे आणि यावेळी त्याने केलेल्या खतरनाक स्टंटमुळे सोशल मीडियावर त्याची हवा झाली आहे. 

३७ वर्षीय धोनी अजूनही पंचवीशीतल्या खेळाडू प्रमाणे तंदुरुस्त आहे. भारताच्या सध्याच्या फिट खेळाडूंत त्याचा समावेश आहे. आजी कर्णधार विराट कोहली प्रमाणे त्याच्याकडे जिम नाही, परंतु लहानसहान फिटनेस ट्रिकने स्वतःला तंदुरुस्त कसे ठेवायचे याचे ज्ञान त्याला आहे. बाईकचा चाहता असलेल्या धोनीने सायकलवर आपले हात आजमावले. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत धोनी सायकलवर बसून स्टंट करताना दिसत आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे धोनी सध्या मायदेशात सुट्टीचा आनंद घेत आहे. आशियाई स्पर्धेत तो पुन्हा मैदानावर दिसेल. 

कॉंग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांची कन्या पुर्णा पटेल हीच्या लग्नाला धोनीने पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासह उपस्थिती लावली होती. त्यात धोनीचा यंग लुक आणि साक्षीने बॉलिवूड अभिनेत्री काजोलच्या गाण्यावर केलेला डान्स चांगलाच चर्चिला गेला. त्यानंतर आता धोनीने सायकलवर केलेला स्टंट शेअर केला आहे आणि त्याने सर्वाना हा स्टंट करण्याचे आवाहन केले आहे. काय आहे हा स्टंट पाहा व्हिडीओ... 

 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारत