T20 WC 2026 Final ... तर ते 'चोकर्स' ठरतील! भारत-न्यूझीलंड यांच्यातील फायनलसंदर्भात डेल स्टेनची भविष्यवाणी

भारत-न्यूझीलंड यांच्यातील फायनलमध्ये कोण भारी ठरेल? अशी चर्चा रंगत असताना दक्षिण आफ्रिकेचा माजी जलदगती गोलंदाज डेल स्टेन याने मोठी भविष्यवाणी केली आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 16:30 IST2026-03-07T16:21:51+5:302026-03-07T16:30:45+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Dale Steyn To Hand Over Choker Tag To New Zealand If They Fail To Beat India In T20 World Cup Final Said It Is Impossible | T20 WC 2026 Final ... तर ते 'चोकर्स' ठरतील! भारत-न्यूझीलंड यांच्यातील फायनलसंदर्भात डेल स्टेनची भविष्यवाणी

T20 WC 2026 Final ... तर ते 'चोकर्स' ठरतील! भारत-न्यूझीलंड यांच्यातील फायनलसंदर्भात डेल स्टेनची भविष्यवाणी

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जेतेपदासाठीची लढत रंगणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ८ मार्चला हे दोन संघ मैदानात उतरणार आहेत. भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये इंग्लंडला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा फायनल गाठली आहे. दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाने उप विजेत्या दक्षिण आफ्रिकेचा खेळ खल्लास करत पहिल्या जेतेपदाच्या  दिशेनं पाऊल टाकले आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यातील फायनलमध्ये कोण भारी ठरेल? अशी चर्चा रंगत असताना दक्षिण आफ्रिकेचा माजी जलदगती गोलंदाज डेल स्टेन याने मोठी भविष्यवाणी केली आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

...तर ते 'चोकर्स' ठरतील

जर न्यूझीलंडचा संघ  भारताला पराभूत करू शकला नाही, तर त्यांना 'चोकर्स'चा टॅग देईन, असे डेल स्टेन म्हणाला आहे. ICC सारख्या मोठ्या स्पर्धेत नाॉकआउटमध्ये सातत्याने पराभवाचा सामना करण्याचा रेकॉर्ड असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 'चोकर्स' म्हटले जाते. न्यूझीलंडच्या संघाच्या बाबतीतही हेच चित्र पाहायला मिळते. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाने फायनलआधी त्यांना डिवचल्याचे दिसते. 

IND vs NZ, Final : अभिषेकसह 'नंबर वन' गोलंदाज आउट? फायनलसाठी कशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन?

भारत-न्यूझीलंड यांच्यातील फायनलसंदर्भात काय म्हणाला डेल स्टेन?

IND vs NZ यांच्यातील मेगा फायनलसंदर्भात एबी डिव्हिलियर्ससोबत गप्पा मारताना डेल स्टेन म्हणाला की, खरं तर प्रत्येकजण दक्षिण आफ्रिकेला चोकर्स म्हणत असतो. पण दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत न्यूझीलंडच्या संघ अधिक वेळा फायनलमध्ये अपयशी ठरला आहे. न्यूझीलंडचा संघ मला आवडतो. त्यांनी पहिली ट्रॉफी जिंकावी, असेही मला वाटते. पण भारतीय संघाविरुद्ध त्यांचा निभाव लागेल, असे वाटत नाही. जर ते जिंकले नाहीत तर मी त्यांना चोकर्सचा टॅग देईन.

भारतीय संघाला पराभूत करणं अशक्यच कारण...

घरच्या मैदानावरील परिस्थितीत भारतीय संघ अधिक मजबूत वाटतो. त्यांना पराभूत करणं कोणत्याही संघासाठी आव्हानात्मक आहे, असे म्हणत डेल स्टेन याने भारतीय संघच फायनल जिंकेल, अशी भविष्यवाणी केली आहे. जर त्याची ही भविष्यवाणी खरी ठरली तर भारतीय संघ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दोन वेळा जेतेपदासह घरच्या मैदानात ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ ठरेल. 

Web Title : टी20 विश्व कप 2026: भारत-न्यूजीलैंड फाइनल पर डेल स्टेन की भविष्यवाणी

Web Summary : डेल स्टेन की भविष्यवाणी: अगर न्यूजीलैंड टी20 विश्व कप फाइनल में भारत से हारता है, तो वे 'चोकर्स' कहलाएंगे। उनका मानना है कि भारत को घरेलू मैदान पर हराना मुश्किल है।

Web Title : T20 WC 2026: Dale Steyn predicts India-New Zealand final outcome.

Web Summary : Dale Steyn predicts that if New Zealand loses to India in the T20 World Cup final, they will earn the 'chokers' tag. He believes India's home advantage makes them nearly unbeatable.