Join us

Daryl Mitchell Daughter Emotional Video: IPL खेळून बाबा घरी परतताच लेकीने मारली घट्ट मिठी, खेळाडू झाला भावूक

तब्बल दोन महिन्यांनी वडील अन् लेकीची झाली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 17:37 IST

Open in App

Daryl Mitchell Daughter Emotional Video: संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सच्या संघाने IPL 2022 चे उपविजेतेपद पटकावले. यंदाच्या हंगामात राजस्थानने धडाकेबाज कामगिरी करून साखळी फेरी संपताना गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांक पटकावला होता. त्यानंतर त्यांनी फायनलपर्यंत धडक मारली. बंगलोर विरूद्धचा करो या मरोचा सामना खेळण्याआधी राजस्थानचा परदेशी ऑलराऊंडर डॅरेल मिचेल बायो-बबल सोडून इंग्लंडला परतला होता. तो इंग्लंड दौऱ्यासाठी लंडनमध्ये दाखल होताच त्याला पाहून त्याच्या लेकीने घट्ट मिठी मारली. या मिठीने मिचेलही भावूक झाल्याचं दिसून आलं.

राजस्थानच्या ताफ्यातील स्टार ऑलराऊंडर असलेला डॅरेल मिचेल याने राजस्थान रॉयल्सचं बायो-बबल सोडलं. तो थेट इंग्लंडला गेला. आपल्या राष्ट्रीय संघासोबत आगामी मालिकेसाठी तो भारतातून लवकर रवाना झाला होता. न्यूझीलंडचा संघ इंग्लंड विरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्या मालिकेसाठी डॅरेल मिचेल निघून गेला होता. तो जेव्हा लंडनमध्ये उतरला, तेव्हा त्याचं कुटुंब त्याची वाट पाहत होतं. आपले वडील समोरून येताना पाहताच त्याच्या छोट्या लेकीने दुडूदुडू धावत जाऊन थेट त्याला घट्ट मिठीच मारली. या मिठीने मिचेल सुखावला अन् भावनिकही झाला. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, राजस्थानने गुजरात विरूद्ध खेळलेल्या प्ले-ऑफच्या पहिल्या सामन्यात डॅरेल मिचेलला प्लेईंग-११ मध्ये स्थान देण्यात आलेले नव्हते. साखळी सामन्यातदेखील त्याला केवळ दोन सामन्यात संधी मिळाली, पण त्यातही त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. राजस्थानच्या संघातील एखादा अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला असता तर डॅरेल मिचेलला संघात स्थान द्यावे लागलं असतं. पण अशा परिस्थितीतही त्यांच्याकडे जेम्स नीशमचा पर्याय उपलब्ध असल्याने डॅरेल मिचेलला संघात फारशी संधी मिळाली नाही.

टॅग्स :आयपीएल २०२२सोशल व्हायरलराजस्थान रॉयल्ससोशल मीडिया
Open in App