Join us  

IPL 2020 त MS Dhoniनं बाकावर बसवून ठेवलेल्या फलंदाजानं दाखवला 'स्पार्क'; चोपल्या ३५० धावा अन् खेचले १७ षटकार!

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20  ( Syed Mushtaq Ali Trophy 2020-21) स्पर्धेचा अंतिम सामना तामिळनाडू आणि बडोदा यांच्यात होणार ...

By स्वदेश घाणेकर | Published: January 30, 2021 4:40 PM

Open in App

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20  ( Syed Mushtaq Ali Trophy 2020-21) स्पर्धेचा अंतिम सामना तामिळनाडू आणि बडोदा यांच्यात होणार आहे. अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन्ही संघातील खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. तामिळनाडूनं उपांत्य फेरीत राजस्थानला, तर बडोदानं पंजाबला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तामिळनाडूच्या यशात नारायण जगदीशन ( Narayan Jagadeesan) याचा सिंहाचा वाटा आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत त्यानं अव्वल स्थान पटकावले आहे. ICC Test Rankings : चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांना बढती; विराट कोहली चौथ्या स्थानी

जगदीशन हा इंडियन प्रीमिअर लीगमधील ( Indian Premier League) चेन्नई सुपर किंग्स ( CSK) संघाचा सदस्य आहे. पण, त्याला आयपीएलमध्ये फक्त पाचच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि त्यातही केवळ दोनच सामन्यात तो फलंदाजी करू शकला. त्यात त्यानं ३३ धावा केल्या. आयपीएल २०२०मध्ये चेन्नईची कामगिरी काही खास झाली नाही, त्यावेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) युवा खेळाडूंमध्ये स्पार्क नसल्याचं विधान केलं होतं. त्याच्यावरून टीकाही झाली होती. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडनं अखेरच्या तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी करून धोनीचं हे विधान खोडून काढले होते. आता जगदीशननं त्याचा दम दाखवला IPL 2021 : १८ फेब्रुवारीला होणाऱ्या लिलावात पाच भारतीय खेळाडूंवर फ्रँचायझी काट मारणार!

.जगदीशननं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत ७ सामन्यांत सर्वाधिक ३५० धावा केल्या. त्यानं ८७.५०च्या सरासरीनं आणि १४२ च्या स्ट्राईक रेटनं ही फटकेबाजी केली. त्यानं स्पर्धेत चार अर्धशतकी खेळी केल्या आणि १७ षटकार खेचले. आता जगदीशनची ही फटकेबाजी पाहिल्यानंतर धोनी आयपीएल २०२१त त्याला फलंदाजी करण्याची संधी देईल, अशी अपेक्षा आहे. २५ वर्षीय जगदीशन हा यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३९.१३च्या सरासरीनं ११७४ धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २३ सामन्यांत ७९० धावा आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३४ सामन्यांत ६८८ धावा आहेत.  Fact Check : किरॉन पोलार्डच्या गाडीचा भीषण अपघात; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूच्या निधनाची चर्चा

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सIPL 2020