Join us  

CSK vs RR Latest News : यशस्वी जैस्वाल जेव्हा MS Dhoni ला भेटला, सामन्यापूर्वी त्यानं जे केलं ते पाहाच

CSK vs RR Latest News : अनुभवी खेळाडूच्या अनुपस्थितीत RRचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानं सलामीला येण्याचा निर्णय घेतला.

By स्वदेश घाणेकर | Published: September 22, 2020 8:18 PM

Open in App

 इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League) आज चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात MS Dhoni आणि Steven Smith हे जगातील दोन सर्वोत्तम कर्णधारांचे नेतृत्व कौशल्य आज पाहायला मिळणार. बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांच्या उपस्थितीत RR आज युवा खेळाडूंना संधी दिली. CSK ने संघात एक बदल केला आहे. अंबाती रायुडू अनफिट असल्यानं त्याच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी दिली आहे. महेंद्रसिंग धोनीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. CSK vs RR Live Score & Updates  

CSK vs RR Live Score: संजू सॅमसनचे 19 धावांत अर्धशतक, CSKच्या गोलंदाजांची केली धुलाई

'पाणीपुरी'वाल्या पोराची 'रॉयल' भरारी; मुंबईकर फलंदाजाचे RRकडून पदार्पण

अनुभवी खेळाडूच्या अनुपस्थितीत RRचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानं सलामीला येण्याचा निर्णय घेतला. त्याच्यासोबत युवा फलंदाज यशस्वी जैस्वालनं IPLमध्ये पदार्पण केले, परंतु त्याला तिसऱ्याच षटकात दीपक चहरने माघारी पाठवले. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चहरच्या बाऊंसरवर फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जागच्या जागी हवेत उडाला, चहरने तो सहज टिपला. स्मिथ आणि संजू सॅमसन ( Sanju Samson ) यांनी RRचा डाव सावरला. CSK vs RR Live Score & Updates  

MS Dhoni-Steve Smith यांच्यातल्या सामन्यात 'हे'पाच खेळाडू छाप सोडणार

यशस्वी जैस्वालचे पदार्पण अन् धोनीसोबत झालेली भेट19 वर्षांखालील वर्ल्ड कप संघाचा सुपरस्टार यशस्वीने या सामन्यातून IPL मध्ये पदार्पण केले. त्यानं 23 वर्षांखालील सी के नायूडू संघात दमदार कामगिरी केली होती आणि त्यामुळे त्याला RRने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यासाठी RRने 2.40 कोटी मोजले. नाणेफेक होण्यापूर्वी यशस्वी CSK कर्णधार MS Dhoni जवळा आला आणि त्याने चक्क हात जोडले.  CSK vs RR Live Score & Updates 

 SRHवरील विजयानंतर विराट कोहली अँड टीमनं ड्रेसिंग रुममध्ये घातला 'धिंगाणा', Video

19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला अंतिम सामन्यात बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. पण, या स्पर्धेत यशस्वीनं 6 डावांत 5वेळा अर्धशतकाहून अधिक धावा केल्या आणि त्यात एका शतकाचा समावेश आहे. शिवाय विजय हजारे चषक स्पर्धेत त्यानं मुंबईचे प्रतिनिधित्व करताना लिस्ट ए क्रिकेटमध्ये 203 धावा चोपल्या होत्या.  CSK vs RR Live Score & Updates 

टॅग्स :IPL 2020महेंद्रसिंग धोनीराजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्स