इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League) आज चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्यात संजू सॅमसन ( Sanju Samson) आणि स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith) यांच्या वादळी खेळीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. जोस बटलरच्या अनुपस्थितीत स्मिथनं सलामीला येण्याचा घेतलेला निर्णय सर्वांना आवडला. त्याला सॅमसनने जबरदस्त साथ दिली. पण, सॅमसन बाद झाल्यानंतर टप्प्याटप्य्यानं RRच्या विकेट्स पडल्या. जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) ने 20 व्या षटकात लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर 30 धावा चोपल्या. याच धावा निर्णायक ठरल्या आणि RRने विजयी सलामी दिली. 

CSK vs RR Live Score & Updates 

CSK vs RR Latest News : शारजात पडला षटकारांचा पाऊस, राजस्थान रॉयल्सने मारली बाजी

-  MS Dhoniची फटकेबाजी पाहण्यासाठी आतुर असलेल्यांची प्रतीक्षा संपली, धोनी मैदानावर आला. पण तो सावध खेळ खेळत होता. दुसऱ्या बाजूनं फॅफ चे वादळ घोंगावत होते. फॅफने अर्धशतक पूर्ण करताना CSKच्या विजयाच्या आशा जीवंत राखल्या होत्या. फॅफ आणि धोनीनं अर्धशतकी भागीदारी केली. 19व्या षटकात फॅफ बाद झाला आणि CSKचा पराभवही निश्चित झाला. त्याने 37 चेंडूंत 72 धावा चोपल्या. त्यात 1 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता. धोनीने अखेरच्या षटकात काही उत्तुंग फटके मारले, परंतु तो पर्यंत खुप उशीर झाला होता. CSKने 6 बाद 200 धावा केल्या. RRने 16 धावांनी हा सामना जिंकला. 

केदार जाधव ( Kedar Jadhav) आणि फॅफ डू प्लेसिस ( Faf du Plessis) यांनी 37 धावांची भागीदारी केली, परंतु टॉम कुरनच्या गोलंदाजीवर जाधव यष्टिंमागे संजू सॅमसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. जाधवने 22 धावा केल्या. संजूनं सुपर कॅच घेत CSKला मोठा धक्का दिला.
 

चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटर हॅण्डलवर झाली चूक; टाय सामना नेमका कोणता?

रोहित, विराट यांना जे जमलं नाही ते संजू सॅमसननं करून दाखवलं, गौतम गंभीरनंही थोपटली पाठ 

यशस्वी जैस्वाल जेव्हा MS Dhoni ला भेटला, सामन्यापूर्वी त्यानं जे केलं ते पाहाच 

महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला, थेट अम्पायरशी भिडला; जाणून घ्या नक्की काय झालं 

'पाणीपुरी'वाल्या पोराची 'रॉयल' भरारी; मुंबईकर फलंदाजाचे RRकडून पदार्पण

- 217 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेन वॉटसन ( Shane Watson) आणि मुरली विजय ( Murali Vijay) यांनी CSKला आश्वासक सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी धावा जोडल्या. राहुल टेवाटीयानं ही भागीदारी तोडली. त्यानं वॉटसनला त्रिफळाचीत केलं. वॉटसन 33 धावा ( 1 चौकार व 4 षटकार) करून माघारी परतला. त्यानंतर श्रेयस गोपाळनं 8व्या षटकात मुरली विजयला ( 21) बाद केलं. सॅम कुरन ( 17) आणि ऋतुराज गायकवाड ( 0) यांनाही फार काळ खेळपट्टीवर टीकता आले नाही. CSKच्या 10 षटकात 4 बाद 82 धावा झाल्या होत्या. 

आयपीएलमधील महागडे 20 वे षटक टाकणारे गोलंदाज

30 धावा- अशोक  दिंडा (आरपीएस) 2017

30 धावा- ख्रिस जाॕर्डन , किंग्ज इलेव्हन, 2020

30 धावा- लुईगी एन्जिडी, चेन्नई सुपरकिंग्ज 2020

29 धावा- शिवम मावी, कोलकाता नाईट रायडर्स, 2018

29 धावा- ड्वेन ब्राव्हो, मुंबई इंडियन्स, 2019

 - राजस्थानने आज मारलेले 17 षटकार हे,आयपीएल डावात त्यांचे सर्वाधिक षटकार आहेत. याआधी 2018 मध्ये बंगलोरविरुध्द आणि 2008 मध्ये हैदराबाद विरुध्द त्यांनी 14-14 षटकार लगावले होते.

आयपीएलमध्ये राजस्थानसाठी सर्वात जलद,अर्धशतके

18 चेंडू- जोस बटलर- 2019
19 चेंडू-.ओवेस शाह- 2012
19 चेंडू-.संजू सॕमसन- 2020

- भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानेही सॅमसनचे कौतुक केलं. तो म्हणाला,''संजू सॅमसन हा देशातील सर्वोत्तम यष्टीरक्षकच नव्हेतर सर्वोत्तम युवा फलंदाज आहे. कुणाला याविषयी वाद घालायचा आहे? ''

Image

- 12व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सॅमसनचा झंझावात लुंगी एनगिडीनं रोखला. त्याच्या गोलंदाजीवर दीपक चहरनं झेल टिपला. सॅमसननं 32 चेंडूंत 1 चौकार  व  9 षटकारासह 74 धावा केल्या. त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर डेवीड मिलर ( David Miller) धावबाद झाला. 

 यशस्वी जैस्वाल जेव्हा MS Dhoni ला भेटला, सामन्यापूर्वी त्यानं जे केलं ते पाहाच

- स्मिथ आणि संजू सॅमसन ( Sanju Samson ) यांनी RRचा डाव सावरला. त्यानं पीयूष चावला ( Piyush Chawla) याच्या एका षटकात 28 धावा चोपून काढताना 19 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. स्टीव्ह स्मिथनेही दुसऱ्या बाजूने दमदार फटकेबाजी केली. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर RRने दहा षटकांत 1 बाद 119 धावांची मजल मारली. 

- अनुभवी खेळाडूच्या अनुपस्थितीत RRचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानं सलामीला येण्याचा निर्णय घेतला. त्याच्यासोबत युवा फलंदाज यशस्वी जैस्वालनं IPLमध्ये पदार्पण केले, परंतु त्याला तिसऱ्याच षटकात दीपक चहरने माघारी पाठवले. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चहरच्या बाऊंसरवर फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जागच्या जागी हवेत उडाला, चहरने तो सहज टिपला. स्मिथ आणि संजू सॅमसन ( Sanju Samson ) यांनी RRचा डाव सावरला. 

- अनुभवी खेळाडूच्या अनुपस्थितीत RRचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानं सलामीला येण्याचा निर्णय घेतला. त्याच्यासोबत युवा फलंदाज यशस्वी जैस्वालनं IPLमध्ये पदार्पण केले, परंतु त्याला तिसऱ्याच षटकात दीपक चहरने माघारी पाठवले. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चहरच्या बाऊंसरवर फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जागच्या जागी हवेत उडाला, चहरने तो सहज टिपला. 

Image

-पदार्पणवीर यशस्वी जैस्वाल तिसऱ्या षटकात माघारी RRला मोठा झटका

 -  यशस्वी जैस्वाल आणि स्टीव्ह स्मिथ सलामीला आले

CSK vs RR Latest News : 'पाणीपुरी'वाल्या पोराची 'रॉयल' भरारी; मुंबईकर फलंदाजाचे RRकडून पदार्पण

Image

- शारजाच्या मैदानावर अबुधाबी व दुबईच्या तुलनेत जास्त धावा होत असतात. छोटे मैदान असल्याने येथे षटकारांचे प्रमाण 29 टक्के आहे जे दुबईला 22टक्के व अबुधाबी ला 11 टक्के आहे.

- अंबाती रायुडू अनफिट, महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला अंतिम 11 संधी. गायकवाडला कोरोना झाला होता आणि त्यावर मात करून तो आज IPLमध्ये पदार्पण करत आहे. 

- युएईमधील या दोन,संघातील एकच सामना चेन्नईने जिंकला आहे तर गेल्या पाच पैकी चार सामने चेन्नईने जिंकलै आहेत.

- चेन्नई सुपर किंग्सचे ( CSK) खेळाडू शाहजाह स्टेडियमवर दाखल 

Image

Image

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्या सामन्यानं IPL 2020चा श्रीगणेशा झाला. MI vs CSK च्या पहिल्याच सामन्यानं Record Break केला. BCCI चे सचिव जय शाह यांनी याबाबतची मोठी घोषणा केली. (  मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स सामन्यानं केला Record Break; जय शाह यांची घोषणा

राजस्थान रॉयल्सविरुद्ध धोनीला खुणावत आहेत ‘हे’ दोन विक्रम

 - MS Dhoni-Steve Smith यांच्यातल्या सामन्यात 'हे'पाच खेळाडू छाप सोडणार

  • वेदर रिपोर्ट । वातावरण उष्ण राहणार असून रात्रीच्या सत्रात दवाचा प्रभाव राहील.
  • पिच रिपोर्ट । येथील खेळपट्टी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना अनुकूल व त्यानंतर फिरकीपटू वर्चस्व गाजवण्याची शक्यता.

 

  • मजबूत बाजू
  • चेन्नई । कॅप्टन कूल धोनीच्या साथीला अनुभवी खेळाडूंचा समावेश. अष्टपैलू सॅम कुरेनचा फॉर्म.
  • राजस्थान । डेव्हिड मिलरकडून मोठ्या अपेक्षा. गोलंदाजीमध्ये जोफ्रा आर्चर व अँड्य्रू टाय भेदक.
  • कमजोर बाजू
  • चेन्नई । संघातील अनेक खेळाडू प्रौढ असल्यामुळे क्षेत्ररक्षण कमकुवत. वेगवान गोलंदाजीमध्ये विविधतेचा अभाव.
  • राजस्थान । भारतीय खेळाडू कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी. संघाची भिस्त विदेशी खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून.

Image

English summary :
CSK vs RR Live Score Rajasthan Royals vs Chennai Super Kings IPL 2020 Live Score and Match updates

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CSK vs RR Live Score Rajasthan Royals vs Chennai Super Kings IPL 2020 Live Score and Match updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.