Out is Out!, MS Dhoniच्या बचावासाठी साक्षीची बॅटिंग, तिसऱ्या अम्पायरवर टीका

CSK vs RR Latest News : कालच्या सामन्यात असा एक प्रसंग घडला की त्याने MS Dhoni ( महेंद्रसिंग धोनी) चर्चेत आला.

By स्वदेश घाणेकर | Published: September 23, 2020 03:16 PM2020-09-23T15:16:35+5:302020-09-23T15:18:29+5:30

whatsapp join usJoin us
CSK vs RR Latest News : Sakshi Dhoni slams 3rd umpire after Tom Curran controversy, deletes tweet later | Out is Out!, MS Dhoniच्या बचावासाठी साक्षीची बॅटिंग, तिसऱ्या अम्पायरवर टीका

Out is Out!, MS Dhoniच्या बचावासाठी साक्षीची बॅटिंग, तिसऱ्या अम्पायरवर टीका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देराजस्थान रॉयल्स संघानं मंगळवारी चेन्नई सुपर किंग्सवर मिळवला विजयसंजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ अन् फॅफ डू प्लेसिसची अर्धशतकी खेळी216 धावांचा पाठलाग करताना CSKला मानावी लागली 16 धावांनी हार

CSK vs RR Latest News : राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यातील सामना हायस्कोरींग ठरला. संजू सॅमसन ( Sanju Samson), स्टीव स्मिथ ( Steven Smith) आणि फॅफ डू प्लेसिस ( Faf du Plessis) यांच्या फटकेबाजीचा शारजाह क्रिकेट स्टेडियम साक्षीदार ठरला. IPL 2020 च्या चौथ्याच सामन्यात असा हायस्कोरींग सामना झाल्याने चाहते पुढील सामन्यांसाठी सज्ज झाले आहेत. पण कालच्या सामन्यात असा एक प्रसंग घडला की त्याने MS Dhoni (  महेंद्रसिंग धोनीची खिलाडूवृत्ती हरवलीय? त्याने जे केलं त्याचं समर्थन करावं का?  ) चर्चेत आला. धोनीच्या खिलाडूवृत्तीवरून टीका होत असताना त्याची पत्नी साक्षी बचावासाठी पुढे आली. पण, 40 मिनिटानंतर तिनं स्वतःचं ट्विट डिलीट केलं. (  CSK vs RR Live Score & Updates  )

महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला, थेट अम्पायरशी भिडला; जाणून घ्या नक्की काय झालं 

संजू सॅमसनची वादळी खेळी अनुभवली, पण हा सुपर कॅच पाहिलात का? Video

महेंद्रसिंग धोनीने खेचलेला षटकार गेला स्टेडियम पार; पाहा तीन खणखणीत Six 

नेमकं काय घडलं? 
18व्या षटकाच्या दीपक चहरने टाकलेल्या 5व्या चेंडूवर टॉम कुरनला पंचांनी बाद असल्याचा निर्णय दिला. चेंडू बॅटला लागून यष्टीमागे धोनीनं झेलल्याचे वाटल्यामुळे पंचांनी कुरनला बाद दिले. पण, पंचांच्या या निर्णयावर कुरन नाराज झाला. RRकडे DRS शिल्लक नसल्यानं त्याला दाद मागता आली नाही. तो पॅव्हिलयनकडे जात असताना रिप्लेत नाबाद असल्याचे दिसले आणि तो मैदानावरच थांबला. त्यानंतर पंचांनी तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली आणि या निर्णयावरून MS Dhoni भडकला. त्यानं स्पष्ट शब्दात पंचांना सुनावलं. तिसऱ्या पंचांना कुरनला नाबाद दिले. (  CSK vs RR Live Score & Updates  )

साक्षी धोनीनं काय ट्विट केलं?
साक्षी म्हणाली की, तुम्हाल टेक्नॉलॉजी वापरायचीच आहे, तर तिचा योग्यरितीनं वापर करा... Out is Out मग तो झेलबाद असो किंवा पायचीत...

सामन्याचा निकाल काय लागला?
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League) आज चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्यात षटकारांचा पाऊस पडला. शारजाहचे स्टेडियम लहान असल्याने प्रत्येकाने बॅटीवर चांगलाच हात आजमावला. या पूर्ण सामन्यात 33 षटकार लगावले गेले. राजस्थान रॉयल्सकडून ( RR) 17, तर चेन्नई सुपर किंग्सकडून ( CSK) 16 षटकार लगावले गेले.  (  CSK vs RR Live Score & Updates  ) 

महेंद्रसिंग धोनी 7व्या क्रमांकाला का आला? कॅप्टन कूलनं सांगितली हुकमी स्ट्रॅटजी

सामन्यात संजू सॅमसन ( Sanju Samson) आणि स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith) यांच्या वादळी खेळीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) ने 20 व्या षटकात लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर 30 धावा चोपल्या.  सॅमसननं 32 चेंडूंत 1 चौकार  व  9 षटकारासह 74 धावा केल्या. स्मिथ 47 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून 69 धावांवर माघारी परतला. आर्चरने 8 चेंडूंत 4 षटकार खेचून नाबाद 27 धावा केल्या. एनगिडीनं अखेरच्या षटकात दोन नो बॉल व एक व्हाईड ब़ॉलही टाकला. RRने निर्धारित षटकात 7 बाद 216 धावा चोपल्या. (  CSK vs RR Live Score & Updates  ) 

Hard Luck!, CSKच्या पराभवानंतर सुरेश रैनानं केलेलं ट्विट व्हायरल

217 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेन वॉटसन ( Shane Watson) 33 धावा करून माघारी परतला. फॅफ डू प्लेसिसनं ( Faf du Plessis)  37 चेंडूंत 72 धावा चोपल्या. त्यात 1 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता. धोनीने अखेरच्या षटकात काही उत्तुंग फटके मारले, परंतु तो पर्यंत खुप उशीर झाला होता. CSKने 6 बाद 200 धावा केल्या. RRने 16 धावांनी हा सामना जिंकला. धोनीनं 17 चेंडूंत 3 षटकारांसह नाबाद 29 धावा केल्या. (  CSK vs RR Live Score & Updates  )

Web Title: CSK vs RR Latest News : Sakshi Dhoni slams 3rd umpire after Tom Curran controversy, deletes tweet later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.