Join us  

CSK vs DC Latest News : महेंद्रसिंग धोनीनं केली सुरेश रैनाशी बरोबरी; दोघांच्याच नावावर आहे हा विक्रम

चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) IPL2020मधील आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

By स्वदेश घाणेकर | Published: September 25, 2020 7:52 PM

Open in App

CSK vs DC Latest News : चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) IPL2020मधील आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. CSKने संघात एक बदल केला असून लुंगी एनगिडीच्या जागी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेझलवूड याला संधी दिली आहे. DCच्या संघातही दोन बदल पाहायला मिळाले. दुखापतग्रस्त आर अश्विनच्या जागी अमित मिश्राला,तर मोहित शर्माच्या जागी आवेश खान याला संधी दिली आहे. या सामन्यात नाणेफेकीला येताच MS Dhoni याने CSKचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाच्या ( Suresh Raina) विक्रमाशी बरोबरी केली. IPLमध्ये आता या दोघांच्याच नावावर हा पराक्रम नोंदवला गेला आहे. DC vs CSK Latest News & Live Score :

IPL 2020 : आम्हालाही तो आदर मिळायला हवा, असं नाही का वाटत? गावस्करांच्या कमेंटवर अनुष्का भडकली

IPL 2020 : वादळी खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला राजस्थान रॉयल्सचा अजब सल्ला, ट्विट व्हायरल

IPL 2020 : डीन जोन्स यांना वाचविण्याचा ब्रेट ली याने केला होता खूप प्रयत्न

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात धोनीनं IPLमध्ये CSKसाठी 100वा विजय मिळवण्याचा विक्रम केला. IPLमध्ये असा विक्रम करणारा तो पहिलाच कर्णधार आहे. याशिवाय IPL इतिहासात सर्वाधिक 38 स्पम्पिंगचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. त्यानंतर दिनेश कार्तिकचा ( 30) क्रमांक येतो. IPLचे सर्वाधिक 9 फायनल त्याने खेळले आहेत.  8 वेळा CSKकडून, तर रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून एकवेळा फायनल खेळला. IPLमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक 94 झेल व 38 स्पम्पिंग करणारा खेळाडू आहे.DC vs CSK Latest News & Live Score : 

शब्दाला शब्द वाढतोय; अनुष्का शर्माच्या टीकेवर सुनील गावस्कर यांचं मोजक्या शब्दात उत्तर

आजच्या सामन्यात त्यानं IPL मध्ये सर्वाधिक 193 सामने खेळण्याच्या सुरेश रैनाच्या विक्रमाशी बरोबरी केली. सुरेश रैनाला IPL मध्ये 200 सामना खेळणारा पहिला खेळाडू बनण्याची संधी होती, परंतु त्यानं वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. 2008पासून धोनी CSKसोबत आहे. त्या मोसमात राजस्थान रॉयल्सनी त्यांना अंतिम सामन्यात पराभूत केले.  त्यानंतर 2009च्या मोसमात CSKला ठिकठाक कामगिरी करता आली आणि 2010मध्ये त्यांनी पहिले जेतेपद पटकावले. त्यानंतर 2011 आणि 2018मध्ये CSKनं बाजी मारली. यासह धोनीच्या नेतृत्वाखाली CSKनं 2010 व 2014चे चॅम्पियन्स लीगचे जेतेपद जिंकले. DC vs CSK Latest News & Live Score :

लॉकडाऊन मे बस....; विराट कोहली - अनुष्का शर्मा यांच्यावरील सुनील गावस्कर यांच्या कमेंटवरून वाद

IPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच नव्हे, तर यापूर्वीही MS Dhoni च्या निर्णयाचा संघाला बसलाय फटका

धोनीच्या नावावर 193* आयपीएल सामन्यांत 4461 धावा आहेत.  

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीसुरेश रैनादिल्ली कॅपिटल्स