भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरला. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League ) १४व्या पर्वासाठी चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) सराव सत्राची सुरूवात झाली. त्यात धोनीला सराव करताना पाहून चाहते सुखावले आहेत आणि त्यामुळेच सोशल मीडियावर #DhoniReturns हा ट्रेंड सुरू झाला आहे. कोरोना चाचणी पूर्ण केल्यानंतर धोनीनं मंगळवारी Indoor सराव केला.
चेन्नईच्या सराव सत्रासाठी धोनी चेन्नईत दाखल होताच सोशल मीडियावर चाहत्यांची चर्चा सुरू झाली होती. त्यात मंगळवारी धोनीचे नेट्समध्ये सराव करतानाचे फोटो व्हायरल झाले. धोनीनं चेन्नईत नव्यान स्थापन केलेल्या MS Dhoni Academyत हा सराव केला. केव्हीन पीटरसनच्या वादळी खेळीला इरफान पठाणचे सडेतोड उत्तर, मनप्रीत गोनीच्या फटकेबाजीनं इंग्लंडचे गोलंदाज निरूत्तर
लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- मोईन अली ( Moeen Ali) ७ कोटी, के गौतम ( K Gowtham) ९.२५ कोटी, चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujra) ५० लाख, हरिशंकर रेड्डी ( Harishankar Reddy) २० लाख, भगत वर्मा ( Bhagath Varma) २० लाख, हरि निशांत (Hari Nishanth) २० लाख.
चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यांचे वेळापत्रक