९ एप्रिलपासून देशात इंडियन प्रिमिअर लीग अर्थात IPL च्या १४ व्या हंगामाला सुरूवात होणार आहे. दरम्यान, आयपीएलचे बहुतांश सामने मुंबईत खेळवले जाण्याची शक्यता आहे. अशातच आता अनेक टीम्स देशातील विविध ठिकाणी दाखल होण्यासही सुरूवात होईल. चेन्नई सुपर किंग्सचा संघ २८ मार्चला मुंबईत दाखल होणार आहे. आयपीएल २०२१ मधील त्यांचे सुरुवातीचे पाच सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. सध्या CSKचे सराव शिबिर चेन्नईत सुरू आहे. परंतु मुंबईत दाखल होण्यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्सनं जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये चेन्नई सुपरकिंग्सचे खेळाडू आपल्याला मुंबई महाराष्ट्रात यायचं असल्यानं मराठीचे धडे घेताना दिसत आहेत. चेन्नई सुपरकिंग्सनं आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये चेन्नई सुपरकिंग्सचे खेळाडू महाराष्ट्रात यायचं असल्यानं महाराष्ट्राची भाषा मराठीमध्ये संवाद साधताना आणि शिकताना दाखवण्यात आले आहेत. दरम्यान आपले अनेक सामने मुंबईत असल्यानं आपण आपल्या सहकारी खेळाडूंना मराठी शिकवत असल्याचं चेन्नईचा खेळाडू ऋतुराज गायकवाड हा सांगताना दिसतोय. चेन्नई सुपरकिंग्सच्या या व्हिडीओला अनेकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. तसंच हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीसही उतरत आहे. 
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Video : जेव्हा Chennai Superkings च्या खेळाडूंना मिळतात 'मराठीचे धडे'
Video : जेव्हा Chennai Superkings च्या खेळाडूंना मिळतात 'मराठीचे धडे'
CSK IPL 2021 : लवकरच IPL च्या १४ व्या हंगामाची होणार सुरूवात, चेन्नई सुपरकिंग्सनं शेअर केला जबरदस्त व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 20:45 IST
Video : जेव्हा Chennai Superkings च्या खेळाडूंना मिळतात 'मराठीचे धडे'
ठळक मुद्देलवकरच IPL च्या १४ व्या हंगामाची होणार सुरूवातचेन्नई सुपरकिंग्सनं शेअर केला जबरदस्त व्हिडीओ