संयुक्त अरब अमिरात (UAE) येथील अबू धाबीच्या एतिहाद अरेना येथे पार पडलेल्या मिनी लिलावात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने (Chennai Super Kings) एकूण ९ खेळाडू आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. लिलावाच्या वेळी मोठ्या खेळाडूवर तेही अनुभवाला पसंती देत अगदी जपून पैसा खर्च करण्याची प्रथा मोडून CSK च्या संघाने युवा खेळाडूंवर पैसा खर्च केला. IPL लिलावात मुंबई इंडियन्स संघ ज्या धाटणीत संघ बांधणी करायचा त्याच प्रकारे यावेळी चेन्नईच्या संघाने लिलावात सर्वोत्तम संघ बांधणी केल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
MS धोनीची 'डॅड्स आर्मी' जवान झाल्याचे चित्र
भारतीय अनकॅप्ड जोडी प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांना प्रत्येकी १४ कोटी २० लाख रुपये मोजत CSK च्या संघाने आपली नवी रणनिती युवा जोश असल्याचे संकेत दिले. अनुभवी खेळाडूंवर चांगला निकाल मिळवण्यावर भर देणाऱ्या चेन्नईच्या संघाने आगामी हंगामासाठी युवा खेळाडूंवर दाखवलेल्या भरवशामुळे MS धोनीची 'डॅड्स आर्मी' जवान झाल्याचे चित्र अगदी सहज दिसून येते. इथं जाणून घेऊयात CSK नं रणनिती बदलासह आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी केलेल्या मजबूत संघबांधणीतील खास गोष्ट
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
CSK नं लिलावात खरेदी केलेले खेळाडू
- अकील होसीन- २ कोटी (बेस प्राइजसह)
- प्रशांत वीर- १४ कोटी २० लाख (बेस प्राइज ३० लाख)
- कार्तिक शर्मा- १४ कोटी २० लाख (बेस प्राइज ३० लाख)
- मॅथ्यू शॉर्ट - १ कोटी५० लाख (बेस प्राइजसह)
- अमन खान- ४० लाख ( बेस प्राइज ३० लाख)
- सरफराज खान- ७५ लाख (बेस्ट प्राइजसह)
- मॅट हेन्री- २ कोटी (बेस प्राइजसह)
- राहुल चाहर- ५ कोटी २० लाख बेस प्राइज १ कोटी)
- झॅक फॉल्केस ७५ लाख (बेस प्राइजसह)
आयपीएल २०२६ साठी चेन्नई सुपर किंग्जचा संघ अन् खेळाडूंचे वय (लिलावाच्या वेळी)
- एम.एस. धोनी – ४४ वर्षे
- मॅट हेन्री – ३४ वर्षे
- शिवम दुबे – ३२ वर्षे
- श्रेयस गोपाल – ३२ वर्षे
- अकिल होसीन – ३२ वर्षे
- जेमी ओव्हरटन – ३१ वर्षे
- नाथन एलिस – ३१ वर्षे
- गुरजप्रीत सिंग – ३१ वर्षे
- संजू सॅमसन – ३१ वर्षे
- मॅट शॉर्ट – ३० वर्षे
- मुकेश चौधरी – २९ वर्षे
- अमन खान – २९ वर्षे
- ऋतुराज गायकवाड – २८ वर्षे
- रामकृष्ण घोष – २८ वर्षे
- खलील अहमद – २७ वर्षे
- सरफराज खान – २७ वर्षे
- उर्विल पटेल – २७ वर्षे
- राहुल चाहर – २६ वर्षे
- अंशुल कंबोज – २५ वर्षे
- झॅक फॉल्केस – २३ वर्षे
- डेवाल्ड ब्रेविस – २२ वर्षे
- नूर अहमद – २० वर्षे
- प्रशांत वीर – २० वर्षे
- कार्तिक शर्मा – १९ वर्षे
- आयुष म्हात्रे – १८ वर्षे
आधी अनुभवी खेळाडूंना दिली जायची पहिली पसंती, आता नव्या प्रयोगाला सुरुवात
आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जनं जी संघ बांधणी केली आहे त्यात युवा आणि अनुभव याचा उत्तम संतुलन पाहायला मिळते. संघातील २५ खेळाडूंचे सरासरी वय काढले तर ते साधारणत: २८ च्या घरात आहे. हे वय क्रिकेटसाठी उमेदीचा काळ मानले जाते. त्यामुळेच डॅड्स आर्मी जवान झाली आहे, असे चित्र CSK च्या बाबतीत तयार होते. याआधी २०१८ ते २०२३ च्या काळात MS धोनीसह रैना, वॉटसन, अंबाती रायडू, जड्डू, मोईन खान आणि हरभजन सिंग सारख्या अनुभवी खेळाडूंसह CSK चा संघ मैदानात उतरल्याचे पाहायला मिळायचे. हे सगळेच खेळाडू संघासाठी जमेची बाजू ठरले. पण त्याच वेळी MS धोनीच्या संघाला अनुभवी खेळाडूंना अधिक प्राधान्य दिल्यामुळे डॅड्स आर्मी असं नाव पडले. आता संघात युवा जोश दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात चेन्नई संघाचं एक वेगळे रुपडे पाहायला मिळेल. ते संघासा किती लाभदायी ठरणार ते पाहण्याजोगे असेल.