Murali Vijay Dating Crickter duaghter, Viral Photo: क्रिकेटपटू आणि अफेयर्स हे समीकरण क्रिकेट चाहत्यांसाठी नवीन नाही. अनेक क्रिकेटपटूंची सेलिब्रिटींसोबत अफेअर असल्याच्या चर्चा नेहमी कानावर येतात. पण सध्या एका अशा भारतीय क्रिकेटपटूची चर्चा रंगली आहे, ज्याचा एका दिग्गज क्रिकेटपटूच्या मुलीसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. तो क्रिकेटपटू आहे बराच काळ चेन्नई सुपर किंग्ज CSK कडून खेळलेला मुरली विजय आणि मुलगी आहे ऑस्ट्रेलियन माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनची (Matthew Hayden) मुलगी ग्रेस हेडन (Grace Hayden). या दोघांच्या एका व्हायरल फोटोमुळे यांच्यात डेटिंग सुरु असल्याची चर्चा रंगली आहे.
मुरली विजयने दोन वर्षांपूर्वी जानेवारी २०२३ मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. माजी सहकारी दिनेश कार्तिक याच्या घटस्फोटित पत्नीशी विवाह केल्याने मुरली विजयच्या वैयक्तिक आयुष्याची बऱ्याच वर्षांपूर्वी चर्चा झाली होती. त्यानंतर आता ग्रेस हेडनसोबत व्हायरल झालेल्या फोटोंमुळे तो पुन्हा चर्चेत आलाय. मुरली विजयने टीम इंडियासाठी ६१ कसोटीत ३९८२ धावा, १७ वनडेमध्ये ३३९ धावा आणि ९ टी२० मध्ये १६९ धावा केल्या. याशिवाय, त्याने १०६ IPL सामन्यांत २,६१९ धावा केल्या. मात्र सध्या तो ग्रेस हेडनसोबतच्या डिनर फोटोमुळे चर्चेचा विषय ठरतोय. पाहा त्यांचा व्हायरल झालेला फोटो.
मुरली विजय हा माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनची मुलगी ग्रेस हेडनसोबत जेवण करताना दिसत आहे. सध्या त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा फोटो कधी काढला गेला हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण दोघांचा एकत्र फोटो पाहिल्यानंतर लोक विविध चर्चा करत आहे.