Join us

क्रोएशियाच्या पोरानं रचला इतिहास; Zach Vukusic ठरला क्रिकेट जगतातील सर्वात युवा कर्णधार

 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात कॅप्टन्सी करणारे खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 19:14 IST

Open in App

Zach Vukusic Youngest Ever Captain In Men's International Cricket : क्रोएशियाच्या जॅक वुकुसिक (Zach Vukusic) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. साइप्रस विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी मैदानात उतरताच तो क्रिकेट जगतातील सर्वात युवा कॅप्टन ठरलाय. १७ वर्षे आणि ३११ दिवस वय असताना त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात क्रोएशिया संघाचे नेतृत्व केले. याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयातील कॅप्टन होण्याचा रेकॉर्ड हा नोमान अमजद याच्या नावे होता. त्याने १८ वर्षे २४ दिवस वय असताना फ्रान्स संघाचे नेतृत्व केले होते. हा रेकॉर्ड मोडत जॅक वुकुसिक याने नवा विश्वविक्रम प्रस्थापित केलाय.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

संघाकडून सर्वोत्तम कामगिरी, पण...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅप्टन्सीत इतिहास रचणाऱ्या वुकुसिक याने फलंदाजीत धमकही दाखवली. ३२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने त्याने ४३ धावांची खेळी केली. पण त्याची ही खेळी संघाच्या कामी काही आली नाही. या सामन्यात क्रोएशिया संघाला ५८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. चौथ्या क्रमांकावर येऊन कर्णधाराने केलेल्या धावा याच क्रोएशिया संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली  सर्वोच्च धावसख्या ठरली.

IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!

 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात कॅप्टन्सी करणारे खेळाडू

  • जॅक वुकुसिक (Zach Vukusic ) (१७ वर्षे ३११ दिवस, २०२५, क्रोएशिया विरुद्ध सायप्रस)
  • नोमान अमजद (Noman Amjad) (१८ वर्षे २४ दिवस, २०२२, फ्रान्स विरुद्ध चेक प्रजासत्ताक)
  • कार्ल हार्टमन (Carl Hartmann) (१८ वर्षे २७६ दिवस, २०२३, आयल ऑफ मॅन विरुद्ध स्पेन)
  • लुव्सांज़ुंडुई एर्डेनेबुलगन (Luwsanzundui Erdenebulgan) (१८ वर्षे  ३२४ दिवस, २०२३, मंगोलिया विरुद्ध  नेपाळ) 
  • राशीद खान (Rashid Khan) (१९ वर्षे  १६५ दिवस २०१८, अफगाणिस्तान विरुद्ध स्कॉटलंड)
टॅग्स :टी-20 क्रिकेट