भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा मैदानातील कामगिरीशिवाय आध्यात्मिक गोडीमुळेही चर्चेत असतो. अनेकदा तो मंदिरं आणि धार्मिक स्थळांना भेट देताना पाहायला मिळाले आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यात रविवारी खेळवण्यात येणाऱ्या वनडे मालिकेतील निर्णायक सामन्याआधी शनिवारी सकाळी पहाटे ४ च्या दरम्यान विराट कोहली महाकालेश्वर मंदिरात पोहचल्याचे पाहायला मिळाले. त्याने टीम इंडियाचा फिरकीपटू कुलदीप यादव आणि फिल्डिंग कोच टी. दिलीप यांच्यासोबत उज्जैनमधील प्रसिद्ध श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन घेतले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहाटे ४ वाजता महाकालाच्या दरबारात हजेरी
विराट आणि कुलदीप शनिवारी पहाटे सुमारे ४ वाजता महाकाल मंदिरात पोहोचले. दोघांनीही भस्म आरतीत सहभाग घेतला आणि जवळपास दोन तास नंदी हॉलमध्ये बसून भगवान महाकालाचे दर्शन घेतले. पूजेदरम्यान मंदिरातील पुजार्यांनी त्यांच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावला. मंदिरातील विराट कोहलीचा कूल आणि साधेपणाची झलक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. देव दर्शनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. जो व्हिडिओ समर आला आहे त्यात विराट कोहली आणि कुलदीप यादव पूजा करताना दिसतात. मंदिराबाहेर पडताना विराटने माध्यमांच्या अभिवादनाला “जय श्री महाकाल” असे उत्तर दिले. कडेकोट सुरक्षेतून दोघेही मंदिराबाहेर आले, यावेळी उपस्थित भाविकांनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला.
T20 Cricket Record : डेविड वॉर्नरची कमाल! सेंच्युरीसह किंग कोहलीला टाकले मागे
कुलदीप यादवने सांगितला अनुभव
दर्शनानंतर कुलदीप यादवने आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, महाकालाचे दर्शन त्यांना प्रचंड शांती आणि आनंद देणारे आहे. जवळपास ९ वर्षांनंतर या मंदिराला भेट दिली, असेही त्याने सांगितले. भगवान महाकालाच्या कृपेने सर्व काही उत्तम सुरू असून पुढेही संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वास कुलदीपने यावेळी व्यक्त केला.
यापूर्वीही खेळाडूंनी घेतले आहे दर्शन
टीम इंडियाचे सदस्य महाकालेश्वर मंदिरात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि विकेटकीपर-फलंदाज केएल राहुल यांनीही महाकालेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचे पाहायला मिळाले होते. स्वतः विराट कोहलीने २०२३ मध्ये पत्नी अनुष्का शर्मासोबत महाकालाचे दर्शन घेतले होते.