Join us  

कुटुंबियांसाठी 'या' क्रिकेटपटूने घेतली ट्वेन्टी-20 सामन्यातून माघार

काही दिवसांमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील ट्वेन्टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी चांगलीच चर्चेत आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 3:57 PM

Open in App

मुंबई : बऱ्याचदा कुटुंबियांना विसरून खेळाडू खेळाला प्राधान्य देताना दिसतो. पण काहीवेळा नाईलाजास्तव खेळाडूला कुटुंबियांसाठी वेळ द्यावा लागतो. एका खेळाडूने कुटुंबियांना वेळ देण्यासाठी चक्क ट्वेन्टी-20 सामन्यातून माघार घेतल्याचे वृत्त आहे.

काही दिवसांमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील ट्वेन्टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी चांगलीच चर्चेत आली आहे. कारण या मालिकेत न खेळण्याचा निर्णय बांगलादेशच्या खेळाडूंनी घेतला होता. आता तर बांगलादेशचा सर्वात अनुभवी खेळाडू शकिब असल हसनला तर बांगलादेश क्रिकेट मंडळाने नोटीस पाठवली आहे.

सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यामध्येही ट्वेन्टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार विजय मिळवला होता. आता दुसऱ्या सामन्यात कोण विजय मिळवतो, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. कारण ही मालिका तीन सामन्यांची आहे. दुसरा सामना जर ऑस्ट्रेलियाने जिंकला तर ते ही मालिका खिशत टाकू शकतात आणि दुसरीकडे श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात येणार आहे. पण हा सामना जर श्रीलंकेने जिंकला तर त्यांचे आव्हान जीवंत राहू शकते.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने दुसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घेतल्याचे वृत्त आहे. कारण मिचेलच्या भावाचे लग्न आहे आणि त्याला लग्नाला उपस्थित राहायचे आहे. त्यामुळे मिचेलने दुसऱ्या सामन्यातून माघार घेतली आहे.

टॅग्स :आॅस्ट्रेलियाभारतबांगलादेशश्रीलंका