Join us  

JAVA बाईकवर ऋतुराज गायकवाड दिसतो छावा! नव्या कोऱ्या बाईकच्या किमतीची मार्केटमध्ये हवा

Cruiser Bike Segment सेगमेंट हा टू व्हीलर क्षेत्रातील एक लोकप्रिय सेगमेंट आहे ज्यामध्ये हेव्ही इंजिन आणि डिझाइनसाठी अशा बाईक्सना प्राधान्य दिले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 2:35 PM

Open in App

Cruiser Bike Segment सेगमेंट हा टू व्हीलर क्षेत्रातील एक लोकप्रिय सेगमेंट आहे ज्यामध्ये हेव्ही इंजिन आणि डिझाइनसाठी अशा बाईक्सना प्राधान्य दिले जाते. या सेगमेंटमधील बाईक्सपैकी एक असलेल्या जावा ४२ बॉबरचे नुकतेच लॉन्चिंग झाले. भारताचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडनेही ( Ruturaj Gaikwad) Jawa 42 Bobber विकत घेतली आहे. ऋतुराजने या क्रूझर बाईकचे मूनस्टोन व्हाइट व्हेरियंट विकत घेतले आहे.

Jawa 42 Bobber मूनस्टोन व्हाईट व्हेरिएंट हा या बाईकचा बेस व्हेरिएंट आहे. ज्याची सुरुवातीची किंमत २,०९,१८७ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि ऑन-रोड ही किंमत रुपये २,३८,१२९ पर्यंत जाते. Jawa 42 Bobber मूनस्टोन व्हाईट ऑन रोड किंमतीनुसार, जर तुम्हाला ही बाईक रोख पेमेंटमध्ये खरेदी करायची असेल, तर तुमच्याकडे यासाठी २.३८ लाख रुपये असणे आवश्यक आहे. पण फायनान्स प्लॅनद्वारे तुम्ही २५,००० रुपये भरून ही बाईक घरी घेऊन जाऊ शकता.

तुमच्याकडे २५,००० रुपये असल्यास बँक बाईकसाठी २,१३,१२९ रुपये कर्ज देऊ शकते. ज्यावर वार्षिक ६ टक्के दराने व्याज आकारले जाईल. Jawa 42 Bobber Moonstone White वर कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला या बाईकचे डाउन पेमेंट म्हणून २५,००० जमा करावे लागतील. यानंतर, तुम्हाला पुढील ३ वर्षांसाठी दरमहा ६४८४ रुपये मासिक EMI म्हणून भरावा लागेल. 

Jawa 42 Bobber Moonstone White मध्ये 334 cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 30.64 पीएस पॉवर आणि 32.74 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :ऋतुराज गायकवाडजावाबाईक
Open in App