Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rinku Singh Father Death: क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन, नोएडातील यथार्थ रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Rinku Singh's Father Demise: भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह याचे वडील मागील काही दिवसांपासून आजारी होते, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 08:05 IST

Open in App

Rinku Singh's Father Dies: भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांनी ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रिंकू सिंहचे वडील खाचंद्र सिंह हे स्टेज-४ यकृताच्या कर्करोगाशी झुंजत होते. मागील काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालावली होती, यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. वडिलांच्या बिघडत्या प्रकृतीची माहिती मिळताच, रिंकू सिंह याला अचानक टीम इंडिया सोडून घरी परतावे लागले.

खानचंद सिंह अनेक दिवसांपासून मेकॅनिकल व्हेंटिलेटर सपोर्टवर होते आणि त्यांना सतत रेनल रिप्लेसमेंट थेरपी दिली जात होती.

टी-२० विश्वचषकातील टीम इंडियाच्या सर्वात महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक असलेल्या रिंकू सिंहने दोन दिवसापूर्वी मायदेशात परतला होता. मंगळवारी टीम इंडियाने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सराव सत्र आयोजित केले होते, पण रिंकू सिंह सहभागी झाला नाही. इतर खेळाडू सराव करताना दिसले. त्यानंतर काही वेळातच बातमी आली की त्याचे वडील गंभीर आजारी आहेत आणि जीवनमरणाशी झुंज देत आहेत. त्यामुळेच रिंकूला घरी परतावे लागले. रिंकू सिंह हा उत्तर प्रदेशातील अलिगडचा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Cricketer Rinku Singh's Father Passes Away in Noida Hospital

Web Summary : Rinku Singh's father, Khachandra Singh, battling stage-4 liver cancer, passed away in a Noida hospital. Rinku returned home from Team India due to his father's declining health, who was on ventilator support. He hailed from Aligarh, Uttar Pradesh.
टॅग्स :ऑफ द फिल्डरिंकू सिंगमृत्यू