Join us

भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूच्या आईचे कोरोनामुळे निधन

देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील १५ दिवस कडक निर्बंधासह लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशाच क्रिकेटपटूच्या घरातही कोरोनानं शिरकाव केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 18:27 IST

Open in App

भारताला २०१२मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या फिरकीपटू हरमीत सिंह याच्या आईचे बुधवारी कोरोनामुळे निधन झाले. परमजीत कौर असं त्याच्या आईचं नाव असून त्या ५६ वर्षांच्या होत्या. 

हरमीत सिंह २०१३मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. त्यानं ३१ प्रथम श्रेणी, १९ लिस्ट ए आणि ७ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ७६ विकेट्स आहेत.२०१८-१९च्या विजय हजारे ट्रॉफीत त्रिपुराकडून सर्वाधिक १३ विकेट्स घेण्याचा पराक्रमही त्यानं केला होता. हरमीत सिंह यानं मद्यधुंद अवस्थेत अंधेरी रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाडी घुसवली होती आणि त्याच्यावर पोलिसांनी कारवाईही केली होती.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघकोरोना वायरस बातम्या