VIDEO : क्रिकेटर डेविड वॉर्नरलाही 'श्रीवल्ली' गाण्यानं लावलं वेड, अल्लू अर्जुनही बघत राहील असा केला डान्स

David Warner Dance on Shrivalli : अल्लू अर्जुन आणि रश्मीका मंदाना यांच्या कामाचंही भरभरून कौतुक केलं जात आहे. तसेच या सिनेमातील 'श्रीवल्ली' गाण्याने आणि त्यातील डान्स स्टेप्सने प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 11:51 AM2022-01-22T11:51:10+5:302022-01-22T11:52:19+5:30

Cricketer David Warner did the dance on Shrivalli song from Pushpa | VIDEO : क्रिकेटर डेविड वॉर्नरलाही 'श्रीवल्ली' गाण्यानं लावलं वेड, अल्लू अर्जुनही बघत राहील असा केला डान्स

VIDEO : क्रिकेटर डेविड वॉर्नरलाही 'श्रीवल्ली' गाण्यानं लावलं वेड, अल्लू अर्जुनही बघत राहील असा केला डान्स

Next

अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) सिनेमा 'पुष्पा' (Pushpa) रिलीज झाल्यापासूनच भारतासहीत जगभरात धुमाकूळ घालत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने जबरदस्त कमाईही केली आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मीका मंदाना यांच्या कामाचंही भरभरून कौतुक केलं जात आहे. तसेच या सिनेमातील 'श्रीवल्ली' गाण्याने आणि त्यातील डान्स स्टेप्सने प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. 

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर डेविड वॉर्नर (David Warner) 'पुष्पा'तील 'श्रीवल्ली' गाण्याचा फॅन झाला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो अल्लू अर्जुनची डान्स स्टेप्स कॉपी करताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नेहमीप्रमाणे त्याने मस्त डान्स केलाय. याआधीही अनेकदा डेविड वॉर्नरने भारतीय गाण्यांवर डान्सचे व्हिडीओ शेअर केले आहे.

या व्हिडीओतील सर्वात मजेदार बाब म्हणजे जेव्हा तो चालण्याचा अॅक्ट करतो आणि त्याच्या पायातून चप्पल निसटते. सेम असंच गाण्यातही दाखवण्यात आलं आहे. इन्स्टाग्राम शेअर केलेल्या या व्हिडीओ लाइक्सचा पाऊस पडत आहे. डेविड वॉर्नरच्या या व्हिडीओला ९ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

'पुष्पा: द राइज' सिनेमातील अल्लू अर्जुनचे काही डायलॉगही फेमस झाले आहेत. लोक या डायलॉग्सवरून रील्स बनवत आहेत. सिनेमातील डायलॉग 'पुष्पा नाम सुनकर फूल समझे क्या? फूल नहीं, फायर हूं, मैं झुकूंगा नहीं' सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
 

Web Title: Cricketer David Warner did the dance on Shrivalli song from Pushpa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app