क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात

Akashdeep Singh Fortuner: लखनऊच्या आरटीओ विभागाने क्रिकेटर आणि त्याला अशी कार विकणारा डीलर सनी मोटर्सविरोधात कारवाई केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 11:00 IST2025-08-12T10:59:56+5:302025-08-12T11:00:30+5:30

whatsapp join usJoin us
Cricketer Akashdeep Singh bought a brand new Toyota Fortuner; it cost a lot, the dealer was also in trouble after RTO action | क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात

क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेटर आकाशदीप सिंह याने नुकतीच फॉर्च्युनर कार घेतली आहे. परंतू, त्याला ही कार विकणारा डीलर गोत्यात आला आहे. कार विकतानाचा एक मोठा नियम त्याने मोडला आहे. यामुळे टोयोटाचा डीलर आता कायदेशीर अडचणीत अडकला आहे. 

आकाशदीपला दिलेली फॉर्च्युनर कार ही आरटीओ रजिस्ट्रेशन, हाय सिक्युरिटी नंबरप्लेट आणि थर्ड रजिस्ट्रेशन मार्क आदी न करताच देण्यात आली होती. काही वर्षांपासून शोरुममधून डिलिव्हरीवेळीच कोणतेही वाहन देताना ते नंबर प्लेट, रजिस्ट्रेशन झालेले देण्याचा कायदा आहे. हा कायदा या डीलरने आणि आकाशदीपने मोडला आहे. यामुळे आकाशदीपला ५ हजार रुपयांचा दंड बसला आहे. 

लखनऊच्या आरटीओ विभागाने क्रिकेटर आणि त्याला अशी कार विकणारा डीलर सनी मोटर्सविरोधात कारवाई केली आहे. ५००० रुपयांचा दंड भरून आकशदीप सुटला असला तरी आरटीओने डीलरला केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ४४ अंतर्गत कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर आकाशदीपला मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ३९, ४१ (६) आणि २०७ अंतर्गत 'वाहन वापर प्रतिबंधक सूचना' जारी करण्यात आली आहे. वाहतूक विभागाने आकाशदीपला नोंदणी, एचएसआरपी आणि वैध विमा पूर्ण होईपर्यंत वाहन न चालवण्याचे निर्देश दिले आहेत. उल्लंघन झाल्यास वाहन जप्त केले जाईल आणि गुन्हा दाखल केला जाईल, असेही बजावण्यात आले आहे. 

वाहनाचे विक्री चलन ७ ऑगस्ट २०२५ रोजी जारी करण्यात आले होते आणि विमा ८ ऑगस्ट २०२५ रोजी काढण्यात आला होता. परंतू,आरटीओकडे रस्ते कर भरण्यात आला नाही. नोंदणी प्रक्रिया अपूर्ण होती. तरीही कार रस्त्यावर आली होती. यामुळे डीलरचे ट्रेड सर्टिफिकेट १ महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच १४ दिवसांच्या मुदतीत समाधानकारक उत्तर न आल्यास डीलरचे ट्रेड सर्टिफिकेट रद्द करण्यात येणार आहे. 

Web Title: Cricketer Akashdeep Singh bought a brand new Toyota Fortuner; it cost a lot, the dealer was also in trouble after RTO action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.