Join us

क्रिकेट विश्वामध्ये भारतीय करतात सर्वात जास्त सट्टेबाजी; आयसीसीचा मोठा खुलासा

श्रीलंकेमध्ये आयसीसीचे भ्रष्टाचारविरोधी पथक काम करत होते. त्यावेळी या फिक्सिंगमध्ये स्थानिक आणि भारताचे सट्टेबाज असल्याचे आयसीसीच्या निदर्शनास आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 13:45 IST

Open in App
ठळक मुद्देक्रिकेट विश्वात सर्वात जास्त सट्टेबाज हे भारताचे आहेत, असे आयसीसीने सांगितले आहे.

मुंबई - श्रीलंकेचा माजी तडफदार सलामीवीर सनाथ जयसूर्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप आयसीसीने लावले आहेत,पण या प्रकरणाचा तपास करताना आयसीसीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. क्रिकेट विश्वात सर्वात जास्त सट्टेबाज हे भारताचे आहेत, असे आयसीसीने सांगितले आहे.

श्रीलंकेमध्ये आयसीसीचे भ्रष्टाचारविरोधी पथक काम करत होते. त्यावेळी या फिक्सिंगमध्ये स्थानिक आणि भारताचे सट्टेबाज असल्याचे आयसीसीच्या निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर क्रिकेट विश्वातील अन्य देशांच्या क्रिकेटपटूबरोबर चौकशी केल्यावर भारताचे सट्टेबाज मोठ्या प्रमाणात असल्याचे पुढे आले आहे. 

आयसीसीचे अधिकारी मार्शल यांनी याबाबत सांगितले की, श्रीलंका, इंग्लंड आणि काही देशांच्या खेळाडूंची आम्ही चौकशी केली. त्यांना आम्ही काही सट्टेबाजांचे फोटोही दाखवले. त्यांनतर त्यांनी जी माहिती दिली ती धक्कादायक होती. क्रिकेट विश्वात भरताचेच सर्वाधिक सट्टेबाज आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे.

टॅग्स :क्रिकेट सट्टेबाजीभारत