Rohan Kunnummal super catch video, Ranji Trophy final: रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भाने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात ३७९ धावा केल्या. दानिश मालेवार याचे दमदार दीडशतक आणि करुण नायरची ८६ धावांची झुंजार खेळी याच्या जोरावर विदर्भाने ही मोठी धावसंख्या उभारली. या सामन्यात अक्षय कर्णेवार याचा रोहन कुन्नुमलने घेतलेला झेल विशेष चर्चेचा विषय ठरला. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर वायरल होत आहे.
विदर्भच्या फलंदाजी वेळी १११ षटक सुरू होते. जलज सक्सेना फिरकी गोलंदाजी करत होता. त्याने अक्षय कर्णेवार याला गुड लेन्थ चेंडू टाकला. तो चेंडू अक्षयने हळूच हवेत टोलवला. चेंडू वेगाने जात होता अशातच रोहन कुन्नुमल याने हवेत उडी घेत अप्रतिम असा झेल टिपला आणि विदर्भाला आठवा धक्का दिला. पाहा त्याने घेतलेला झेल-
दरम्यान, अंतिम सामन्यात विदर्भने सलामीवीर पार्थ रेखाडे (०) आणि ध्रुव शोरे (१६) यांची विकेट झटपट गमावली. दर्शन नाळकंडे (१६) देखील स्वस्तात बाद झाला. त्यानंतर दानिश मालेवार आणि करूण नायर यांनी द्विशतकी भागीदारी केली. करूण नायर आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ८६ धावांवर बाद झाला. तर दानिश मालेवारने १५ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर १५३ धावा केल्या. या दोघांनंतर कुणालाही मोठी खेळी करता आली नाही. यश ठाकूर (२५), यश राठोड (तीन), अक्षय वाडकर (२३), अक्षय कर्णेवार (१२), हर्ष दुबे (नाबाद १२) आणि नचिकेत भुते (३२) धावा काढून बाद झाला.