Babar Azam vs Shaheen Shah Afridi Viral Video : सध्या सर्वांना भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याची प्रतीक्षा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा १९ तारखेपासून सुरु होणार आहे. तर IND vs PAK सामना २३ फेब्रुवारीला होणार आहे. या स्पर्धेआधी दोनही संघ आपापल्या देशात वनडे फॉरमॅटची तयारी करत आहेत. भारतीय संघ ६ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. तर पाकिस्तानातन्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांची ८ फेब्रुवारीपासून तिरंगी मालिका होणार आहे. या मालिकेआधी पाकिस्तानी संघाने एक प्रक्टिस मॅच खेळली. त्यातही पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमचं हसं झालं.
बाबर आझम इथेही 'फ्लॉप'!
पाकिस्तानी संघ सध्या तिरंगी मालिकेसाठी कसून तयारी करताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानने त्यांच्याच खेळाडूंचे दोन गट करून एक प्रॅक्टिस मॅच खेळवली. या प्रॅक्टिस मॅचमध्ये बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद रिझवान यांसारख्या बड्या खेळाडूंच्या कामगिरीवर साऱ्यांचे विशेष लक्ष होते. आफ्रिदीने आपल्या गोलंदाजीची धार दाखवून दिली. पण त्यात नेमका बाबर आझमच उद्ध्वस्त झाला. आफ्रिदीने गोलंदाजी करत बाबरला शून्यावर बाद केले. पायाजवळ पडलेला चेंडू बाबरला समजला नाही. तो लेग साईडला फटका खेळायला गेला आणि त्यातच तो LBW झाला. पाहा VIDEO-
तिरंगी मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ
फखर झमान, बाबर आझम, उस्मान खान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अशरफ, मोहम्मद रिझवान (कर्णधार, यष्टीरक्षक), खुशदिल शाह, सलमान अली आघा (उपकर्णधार), अबरार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद हसनैन, हॅरिस रौफ, नसीम शाह.