Join us

Syed Mushtaq Ali Trophy World Record : विदर्भाच्या फिरकीपटूचा विश्वविक्रम, ट्वेंटी-२०त चारही षटकं निर्धाव फेकणारा ठरला जगातला पहिला गोलंदाज 

विदर्भाच्या अक्षय कर्नेवारनं (Akshay karnewar) केला जागतिक विक्रम. ही कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 00:04 IST

Open in App

मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ (Mushtaq Ali Trophy 2021) स्पर्धेमध्ये विदर्भाच्या अक्षय कर्नेवारनं (Akshay Karnewar) एक जागतिक विक्रम केला आहे. त्यानं या सामन्यात टाकलेल्या चारही षटकांमध्ये एकही धाव दिली नाही, टी २० सामन्यांत ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. फिरकीपटू अक्षय हा विदर्भाकडून खेळत असून त्यानं मणीपूरविरोधातील सामन्यात हा विक्रम केला. त्यानं चारही षटकांमध्ये एकही धाव दिली नाही, याव्यतिरिक्त त्यानं दोन गडीही बाद केले. विदर्भानं हा सामना १६७ धावांनी जिंकला. यापूर्वी हा विक्रम गौरव गंभीर याच्या नावे होता. त्यानं ३ षटकांमध्ये एकही धाव न देता २ गडी बाद केले होते. गौरवनं याच वर्षी जानेवारी महिन्यात हा विक्रम केला होता.

विदर्भानं सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत ४ विकेट्सच्या जोरावर २२२ धावांचा डोंगर उभा केला होता. संघाकडून जितेश शर्मानं सर्वाधिक नाबाद ७१ धावा केल्या. त्यानं ३१ चेंडूंचा सामना करत ७१ धावा केल्या. त्यानं ५ चौकार आणि ५ षटकारांच्या जोरावर इतक्या धावा केल्या. मणीपूरच्या संघानं या धावसंख्येचा पाठलाग करताना १६.३ षटकांमध्ये ५५ धावा केल्या. त्यांच्यापैकी ९ फलदांचांना १० धावाही करता आल्या नाही. विदर्भानं हा सामन्या मोठ्या फरकानं जिंकला. 

मुंबईचा पराभवदुसरीकडे मुंबई विरुद्ध छत्तीसगढ या सामन्यात (Mumbai vs Chhattisgarh) मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात मुंबईचा एका धावेने पराभव झाला. छत्तीसगढच्या १५८ धावांचा पाठलाग करताना मुंबईला २० षटकांमध्ये ५ विकेट्स गमावून १५६ धावा करता आल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेनं या सामन्यात ५५ चेंडूंचा सामना करत नाबाद ६९ धावा केल्या.

टॅग्स :विदर्भमुंबई
Open in App