Join us  

Good News : भारतात 15 जूनपासून क्रिकेट लीगचा शुभारंभ

मार्च महिन्यापासून देशातील क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 5:45 PM

Open in App

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेली अडीच महिने लॉकडाऊन जाहीर केला गेला होता. पण, आता काही नियमांत शिथिलता देण्यात आली आहे. भारतातील क्रिकेट चाहते लाईव्ह अॅक्शनसाठी आतुर आहेत. त्यांच्यासाठी गुड न्यूज आली आहे. 15 जूनपासून देशात क्रिकेट लीगला सुरुवात होणार आहे. सोमवारपासून पंजाब टी10 लीगला सुरुवात होणार आहे. भटींडा येथे या लीगचे सामने खेळवण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात देशात सुरू होणारी पहिलीच क्रिकेट स्पर्धा असेल.

मार्च महिन्यापासून देशातील क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. 29 मार्चपासून सुरू होणारी इंडियन प्रीमिअर लीगची अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यात बीसीसीआयनं श्रीलंका दौऱ्यावर जाणार नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले. आता भारतीय संघ आगामी झिम्बाब्वे दौऱ्यावरही जाणार नसल्याची घोषणा बीसीसीआयनं केली. नियोजित वेळापत्रकानुसार भारतीय संघ 24 जूनपासून  सुरु होणाऱ्या तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 मालिकेसाठी श्रीलंकेला जाणार होता आणि त्यानंतर 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार होता.  (नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न: IPL 2020बाबतच्या 'त्या' निर्णयावरून फ्रँचायझींमध्ये मतभेद)

पण, आता पंजाब टी 10लीगच्या निमित्तानं देशात क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहे. अम्रीतसर अॅलिगेटर, भटींडा बुल्स, फिरोजपूर फॅल्कन्स, लुधियाना लायन्स, मोगा मोंगूस आणि पटियाला पँथर्स अशा सहा संघांचा या लीगमध्ये समावेश आहे. 16 दिवस चालणाऱ्या या लीगमध्ये 33सामने होणार आहेत. प्रत्येत दिवशी दोन समने खेळवण्यात येतील. अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर 30 जूनला अंतिम सामना होईल.  खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सर्व उपाययोजना केल्या आहेत. चेंडू चमकावण्यासाठी थुंकीच्या वापरावर बंदी असल्याचे आयोजन बलविंदर कुमार शर्मा यांनी स्पष्ट केले.( BCCIची मोठी घोषणा; श्रीलंकेपाठोपाठ भारतीय संघाचा आणखी एक दौरा स्थगित

अन्य महत्त्वाच्या बातम्या

डॅरेन सॅमीच्या वादात स्वरा भास्करची उडी; म्हणते, सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनी माफी मागावी!

भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषाचे आरोप करणाऱ्या डॅरेन सॅमीची माघार; 'कालू'चा अर्थ उमगला 

डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम गिलख्रिस्ट यांनी मानले भारतीय विद्यार्थांचे आभार; वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

BCCI पैशांसाठी IPL 2020च्या आयोजनाचा हट्ट करतेय का? खजिनदार अरुण धुमाल म्हणतात...

पाकिस्तानात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना 'राजा'सारखी वागणूक देतो; वर्णद्वेषाच्या मुद्द्यात PSLमालकाची उडी

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या एका घोषणेनं BCCIला बसणार 4000 कोटींचा फटका! 

टॅग्स :टी-10 लीगपंजाब