ऑस्ट्रेलियात रोहित-विराटच्या निरोप समारंभाची तयारी; पण एवढी घाई का? जाणून घ्या त्यामागची गोष्ट

ऑस्ट्रेलिला का लागलीये त्यांना निरोप देण्याची घाई? असा प्रश्नही काही चाहत्यांना पडू शकतो. इथं जाणून घेऊयात त्यामागची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:00 IST2025-06-11T12:49:59+5:302025-06-11T13:00:05+5:30

whatsapp join usJoin us
Cricket Australia Want To Give A Send Off To Virat Kohli And Rohit Sharma Possibly Playing Their Final Series In Australia | ऑस्ट्रेलियात रोहित-विराटच्या निरोप समारंभाची तयारी; पण एवढी घाई का? जाणून घ्या त्यामागची गोष्ट

ऑस्ट्रेलियात रोहित-विराटच्या निरोप समारंभाची तयारी; पण एवढी घाई का? जाणून घ्या त्यामागची गोष्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रोहित शर्मा आणि विराट कोहली या टीम इंडियातील जोड गोळीनं आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेट पाठोपाठ कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. आता ते फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसतील. ही जोडी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी दिसणार? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला असताना ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड या दोन दिग्गजांसाठी निरोप देण्याची तयारी करण्यास उत्सुक असल्याची माहिती समोर आली आहे. टीम इंडियाची सुपर हिट जोडी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय असताना ऑस्ट्रेलिला का लागलीये त्यांना निरोप देण्याची घाई? असा प्रश्नही काही चाहत्यांना पडू शकतो. इथं जाणून घेऊयात त्यामागची गोष्ट

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुन्हा मैदानात खेळताना दिसतील विराट-रोहित  

भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. पण रोहित आणि विराट कोहली दोघांनी या दौऱ्याआधीच कसोटीतून निवृत्ती घेतलीये. या दौऱ्यानंतर टीम इंडिया ऑगस्टमध्ये बागंलादेश दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे मालिका खेळेल. या दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.

अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला रोहित-विराटला निरोप देण्याची घाई? कारण...

भारताच्या या दोन्ही दिग्गजांसाठी ही मालिका अविस्मरणीय करण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड प्रयत्नशील आहे. यामागचं कारण असं की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी हा अखेरचा ऑस्ट्रेलिया ठरू शकतो. टी-२० आणि कसोटीतून निवृत्ती घेतल्यावर ही जोडी २०२७ च्या वनडे वर्ल्ड कप पर्यंतच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसेल, असे मानले जाते. पुढच्या वर्षी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकही वनडे सामना खेळणार नाही. त्यामुळेच ऑक्टोबरमध्ये रंगणाऱ्या वनडे मालिकेत भारताच्या दोन्ही स्टार खेळाडूंचा खास सन्मान करत हा दौरा खास करण्याचा प्लॅन ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने आखल्याचे दिसते.     

कदाचित ते पुन्हा ऑस्ट्रेलियात खेळताना दिसणार नाहीत 
 
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे  सीईओ टॉड ग्रीनबर्ग म्हणाले आहेत की, यंदाच्या हंगामात भारतीय संघाचा दौरा  खास असेल. कदाचित या दौऱ्यातील वनडे मालिकेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे ऑस्ट्रेलियन मैदानात खेळताना दिसणार नाहीत. आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये अविश्वसनीय कामगिरी करुन दाखवणाऱ्या दोन भारतीय दिग्गजांसाठी हा दौरा अविस्मरणीय राहिल, याची आम्ही निश्चितच खास तयारी करु, अशा आशयाचे वक्तव्य ग्रीनबर्ग यांनी केले आहे.

Web Title: Cricket Australia Want To Give A Send Off To Virat Kohli And Rohit Sharma Possibly Playing Their Final Series In Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.