ऑस्ट्रेलियन खेळाडू IPL ला प्राधान्य देणार की, WTC फायनलच्या तयारीला? बोर्डानं स्पष्ट केली भूमिका

१७ मे पासून आयपीएल स्पर्धेतील सामने पुन्हा खेळवण्यात येणार असून सुधारित वेळापत्रकानुसार, ३ जूनला या स्पर्धेची फायनल खेळवण्यात येणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 10:57 IST2025-05-13T10:54:20+5:302025-05-13T10:57:09+5:30

whatsapp join usJoin us
Cricket Australia Statement For Australian Players Return To India For IPL 2025 | ऑस्ट्रेलियन खेळाडू IPL ला प्राधान्य देणार की, WTC फायनलच्या तयारीला? बोर्डानं स्पष्ट केली भूमिका

ऑस्ट्रेलियन खेळाडू IPL ला प्राधान्य देणार की, WTC फायनलच्या तयारीला? बोर्डानं स्पष्ट केली भूमिका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025: भारत-पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थितीत स्थगित करण्यात आलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धतील उर्वरित सामन्यासंदर्भातील चित्र स्पष्ट झाले आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामात रद्द करण्यात आलेला पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यासह १७ सामन्यांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १७ मे पासून आयपीएल स्पर्धेतील सामने पुन्हा खेळवण्यात येणार असून सुधारित वेळापत्रकानुसार, ३ जूनला या स्पर्धेची फायनल खेळवण्यात येणार आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

इकडं IPL चे नवे वेळापत्रक आले, तिकडे WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघ ठरला

एका बाजूला आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर झाले असताना दुसऱ्या बाजूला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढच्या महिन्यात ११ जून पासून सुरु होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा केली आहे. या संघातील अनेक खेळाडू आयपीएलचा भाग आहेत. नॅशनल ड्युटीसाठी तयार होण्याआधी ऑस्ट्रेलियन खेळाडू पुन्हा आयपीएलमध्ये दिसणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासंदर्भातही आपली भूमिका एकदम स्पष्ट केली आहे. 

विराट कोहली पाकिस्तान विरुद्ध एकही कसोटी सामना नाही खेळला, कारण...

IPL संदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खेळाडूंना दिले स्वातंत्र्य 

WTC फायनलच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन खेळाडू IPL स्पर्धेत खेळणार का? या प्रश्नासंदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिकृतरित्या एक निवेदन जाहीर केले आहे. यात त्यांनी म्हटलंय की, आयपीएलमध्ये खेळायचं की नाही ते खेळाडूंचा वैयक्तिक निर्णय आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा खेळाडूंच्या निर्णयाला पाठिंबा असेल. उर्वरित आयपीएल सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूंसाठी संघ व्यवस्थापन  WTC फायनलच्या दृष्टीने तयारी करेल, असा उल्लेखही करण्यात आलाय.

या IPL फ्रँचायझी संघांची ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर आहे मदार 

प्लेऑफ्सच्या शर्यतीत असणाऱ्या IPL फ्रँचायझी संघामध्ये मिचेल स्टार्क, जेक फ्रेजर-मॅकगर्क (DC), स्पेंसर जॉनसन (KKR), मिशेल मार्श (LSG), जोश हेजलवूड, टिम डेविड (RCB), मार्कस स्टोयनिस, मिच ओवेन, जोश इंग्लिस, आरोन हार्डी, झेवियर बार्टलेट (PBKS) या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश आहे.  


IPL 2025 नवे वेळापत्रक

  • १७ मे : आरसीबी vs कोलकता नाईट रायडर्स (बंगळुरु)
  • १८ मे : राजस्थान रॉयल्स vs पंजाब किंग्ज (जयपूर)
  • १८ मे : दिल्ली कॅपिटल्स vs गुजरात टायटन्स (दिल्ली)
  • १९ मे : लखनौ सुपर जाएंट्स vs सनरायझर्स हैदराबाद (लखनौ) 
  • २० मे : चेन्नई सुपर किंग्ज vs राजस्थान रॉयल्स (दिल्ली)
  • २१ मे : मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्स (मुंबई)
  • २२ मे : गुजरात टायटन्स vs लखनौ (अहमदाबाद)  
  • २३ मे :  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु vs सनरायझर्स हैदराबाद (बंगळुरु)
  • २४ मे :  पंजाब किंग्ज vs दिल्ली कॅपिटल्स (जयपूर)
  • २५ मे : गुजरात टायटन्स vs चेन्नई सुपर किंग्ज (अहमदाबाद)
  • २५ मे : सनरायझर्स हैदराबाद vs कोलकाता नाईट रायडर्स (दिल्ली)
  • २६ मे : पंजाब किंग्ज vs मुंबई इंडियन्स (जयपूर)
  • २७ मे : लखनौ सुपर जाएंट्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (लखनौ) 
     

IPL 2025 Playoffs सामन्यांचे शेड्यूल

२९ मे : क्वालीफायर १ (ठिकाण ठरलेले नाही)
३० मे : एलिमिनेटर (ठिकाण ठरलेले नाही)
१ जून : क्वालीफायर २ (ठिकाण ठरलेले नाही)
३ जून: फायनल (ठिकाण ठरलेले नाही)
 

Web Title: Cricket Australia Statement For Australian Players Return To India For IPL 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.