Join us

Cricket Australia: पॅट कमिन्सला विचारले होते त्याचे रहस्य तर नाही ना...

Cricket Australia: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होण्याआधी निवड समितीने Pat Cummins ला विचारले होती की, त्याचे कोणते रहस्य तर नाही. आणि जर असेल तर ते त्याने निवड समितीला सांगावे. कमिन्सला ॲशेस मालिकेच्या आधी ऑस्ट्रेलियाचा ४७ वा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 06:05 IST

Open in App

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होण्याआधी निवड समितीने पॅट कमिन्सला विचारले होती की, त्याचे कोणते रहस्य तर नाही. आणि जर असेल तर ते त्याने निवड समितीला सांगावे. कमिन्सला ॲशेस मालिकेच्या आधी ऑस्ट्रेलियाचा ४७ वा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. टीम पेन याने गेल्या अठवड्यात पद सोडले होते. कमिन्स सोबतच माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ याला उपकर्णधार बनवण्यात आले होते.   कमिन्स याने एका मुलाखतीत म्हटले की, ‘हो त्यांचे काही प्रश्न होते. मात्र त्याबाबत मी विस्ताराने सांगू शकत नाही. ही एक खुली चर्चा होती. कारण आम्ही अनेक बाबींबाबत चर्चा केली. आणि त्यामुळे खरंच खूपच सहज वाटत होते.’ ऑस्ट्रेलियन निवड समितीने तीन वर्षांपूर्वी बॉलच्या छेडछाडीच्या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या स्टिव्ह स्मिथ याला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. 

उद्याही सामना खेळायचा असल्यास आम्ही सज्ज - कमिन्ससिडनी : पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या बहुचर्चित ऍशेस मालिकेच्या तयारीबाबत विचारले असता ऑस्ट्रेलियाचा नवनियुक्त कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला, आमची तयारी पूर्ण झाली आहे. आमचे फलंदाज मोठी खेळी करण्यास सज्ज आहे. आमचे गोलंदाजही सर्वोच्च कामगिरी करण्यास तयार आहेत. त्यामुळे सामना उद्या जरी खेळवायचा असला तरी आम्ही मैदानावर उतरण्यास तयार आहोत. कमिन्स ऑस्ट्रेलियाचा ४७ वा कसोटी कर्णधार ठरला असून, गेल्या ६५ वर्षांत वेगवान गोलंदाज म्हणून तो पहिलाच पूर्णकालीन कर्णधार असेल. पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाकडून तीनही प्रकारात खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे.

टॅग्स :आॅस्ट्रेलियाआंतरराष्ट्रीय क्रिकेट
Open in App