धक्कादायक; ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आयोजनासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया अनुत्सुक; ICCकडे केली विनंती

ICCचा मोठा दणका; BCCIला गमवावे लागेल 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 02:44 PM2020-05-28T14:44:32+5:302020-05-28T14:47:16+5:30

whatsapp join usJoin us
Cricket Australia Not Looking Forward to Hosting 2020 T20 World Cup svg | धक्कादायक; ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आयोजनासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया अनुत्सुक; ICCकडे केली विनंती

धक्कादायक; ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आयोजनासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया अनुत्सुक; ICCकडे केली विनंती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देआयसीसीची आज महत्त्वाची बैठक, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपबाबत होणार निर्णयवर्ल्ड कप स्थगित झाल्यास आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा मार्ग मोकळा

कोरोना व्हायरसच्या संकटात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आज महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. पण, आता एक धक्कादायक बाब समोर येत आहे. यंदा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा आयोजनासाठी क्रिकेट ऑस्ट्रेतिलाच उत्सुक नसल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलं आहे. त्याऐवजी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं पुढील वर्षी भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपचे यजमानपद त्यांना मिळावे, अशी विनंती आयसीसीकडे केली आहे.

भारत सरकारकडून मिळत नसलेल्या कर सवलतीमुळे आयसीसीनं 2021चं यजमानपद काढून घेण्याची धमकी बीसीसीआयला दिली आहे. त्यात 2020च्या स्पर्धा आयोजनाचं संकटही त्यांच्या डोक्यावर आहे. 2020चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2022मध्ये स्थगित करण्यात येईल, अशी चर्चा होती. पण, आयसीसीनं बुधवारी हे वृत्त फेटाळून लावले. ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसारच खेळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आयसीसीनं स्पष्ट केलं. 

कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियावर आर्थिक संकट ओढावलं आहे आणि त्यामुळे यंदाच्या एवजी त्यांना 2021मध्ये वर्ल्ड कप आयोजन करायचा आहे, 2022मध्ये नाही. त्यामुळे आता आयसीसी काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पुढील वर्षी  होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद भारताकडून काढून घेतले जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) तशी धमकीच बीसीसीआयला दिल्याचे वृत्त आहे.

बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यात करात सूट देण्यावरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आयसीसीला भारत सरकारकडून करात सूट हवी आहे. ती मिळवण्यासाठी बीसीसीआयचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आयसीसीनं सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या बीसीसीआयला खरमरीत मेल पाठवला आहे. त्यात त्यांनी ही स्पर्धा दुसरीकडे हलवण्याचे अधिकार आमच्याकडे असल्याचे मत व्यक्त केले गेले आहे.

बीसीसीआयला 18 मे पर्यंतची मुदत आयसीसीनं दिली होती. पण, ती 30 जूनपर्यंत वाढवून मिळावी अशी विनंती बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. ''बीसीसीआयसोबतचा ICC Business Corporation करार 18 मे नंतर कधीही संपुष्टात आणू शकतो,''असे आयसीसीचे सल्लागार जॉनथन हॉल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,''करात सूट मिळवण्याच्या मुद्या सोडवण्यासाठी बीसीसीआयला बराच बराच वेळ देण्यात आला. आता आणखी वेळ देण्यात काहीच अर्थ नाही. IBCचा करार 30 जून 2020पर्यंत वाढवण्याची विनंती मान्य करण्यात अर्थ नाही.''
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Bad News : खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; एक महिन्याच्या कन्येचं निधन

IPL 2020 न होऊ देण्याचा पाकिस्तानचा घाट; ICCच्या बैठकीपूर्वी खेळला डाव 

MS Dhoniची पत्नी भडकली; म्हणाली, लॉकडाऊनमुळे लोकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय

आयला सचिन... मास्टर ब्लास्टरनं शेअर केला वेस्ट इंडिजच्या दिग्गजाच्या मुलाचा फोटो अन्...

सानिया मिर्झाची 'मन की बात'; शोएबसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण

Web Title: Cricket Australia Not Looking Forward to Hosting 2020 T20 World Cup svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.